रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:51 PM2022-12-14T17:51:16+5:302022-12-14T17:52:26+5:30

Maharashtrachi Hasyajatra : सर्कस सिनेमाचा चमू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे.

Rohit Shetty's 'Circus' will be staged at the 'Maharashtra Laughter Fair' | रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

रोहित शेट्टी यांची 'सर्कस' रंगणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ( Maharashtrachi Hasyajatra) या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. आता बॉलिवूडच्या अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. समीर चौघुले,गौरव मोरे, शिवली परब, दत्तू मोरेंचे कलाकार रणवीर सिंग सोबत स्कीट सादर करताना दिसणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचा एनर्जेटिक सुपरस्टार सिद्धार्थ जाधव देखील असेल. सर्कस (Cirkus) सिनेमाचा चमू 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात  उपस्थित असणार आहे.  

विशेष म्हणजे ज्यावेळी सर्कस सिनेमाचे शूटींग सुरु होते तेव्हापासूनच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जायचे अशी चर्चा कलाकारांंमध्ये सुरु होती. शेवटी प्रदर्शनाची तारीख ठरली तेव्हा सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात जाण्याची उत्सुकता होती असे कलाकारांनी सांगितले. विशेष म्हणजे रणवीर सिंग यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा पाहायला सुरवात केली आणि सलग २ तास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम पाहताना मंत्रमुग्ध झाला. त्याचा तो उत्साह आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या या भागात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल.   


त्यावेळी रोहित शेट्टी, रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडीस, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर आणि विजय पाटकर हे  उपस्थित असणार आहेत आणि हास्याच्या मंचावर हास्याचे फटाके फुटणार आहेत. मंचावर एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टी यांची सर्कस हास्यजत्रेच्या मंचावर आल्याने मंचावर घडलेली धमाल पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' १९ आणि २० डिसेंबर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Rohit Shetty's 'Circus' will be staged at the 'Maharashtra Laughter Fair'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.