रोहिताश गौर म्हणजेच मनमोहन तिवारी यांना ‘भाभीजी घर पर है’मध्ये भूताने पछाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 05:23 AM2018-02-20T05:23:09+5:302018-02-20T10:53:09+5:30

छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’,आपल्या विक्षिप्त परंतु मजेशीर, रोमांचक कथानकाने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवते. आगामी ...

Rohitash Gaur, that is, Manmohan Tiwari, 'Bhabhiji is at home', the ghost got trapped | रोहिताश गौर म्हणजेच मनमोहन तिवारी यांना ‘भाभीजी घर पर है’मध्ये भूताने पछाडले

रोहिताश गौर म्हणजेच मनमोहन तिवारी यांना ‘भाभीजी घर पर है’मध्ये भूताने पछाडले

googlenewsNext
ट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’,आपल्या विक्षिप्त परंतु मजेशीर, रोमांचक कथानकाने प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवते. आगामी भागात रसिक आपल्या आवडत्या ‘तिवारीजी’ला भूतबाधा होताना पाहणार आहेत.येत्या आठवड्यात आपण पाहू की, सक्सेना एका फ्लॉप बंगाली दिग्दर्शकाची खुर्ची बक्षीस म्हणून घरी आणतो.अभिनयाची जादुई दुनिया आजमावण्याची इच्छा अनिता भाभी (सौम्या टंडन) व्यक्त करते.तिला अभिनेत्री बनायचे आहे हे तिवारीला समजते तेव्हा तो प्रचंड खूश होतो, उत्साहित होतो आणि तिला पाठिंबा देण्याचे कबूल करतो.सक्सेनाने आणलेल्या डिरेक्टरच्या-खुर्चीच्या जेव्हा तो संपर्कात येतो आणि विक्षिप्तपणे वागू लागतो तेव्हा खरी मजा येते.तो बंगालीमध्ये बरळू लागतो आणि सगळे ह्या मतावर येतात की तिवारीला बंगाली दिग्दर्शकाचे भूत झपाटले आहे.याबाबत रोहिताशला विचारले असता तो म्हणाला की, “येत्या एपिसोडमध्ये तुम्ही मला भूताने झपाटलेले पाहाल.मला नट म्हणून ज्या अनेकविध प्रकारच्या भूमिका करायला मिळतात त्या
मी एन्जॉय करतो आणि मला वाटते तेच तुमचा विकास करण्यास मदत करतात.मला माझे बंगाली संवाद प्रथम हिंदीत समजावून घेऊन मगच पाठ करावे लागायचे.ह्या अर्थाने हा एपिसोड निश्चितपणे आव्हानात्मक होता.हा एक बदल होता पण अर्थात ही भूमिका रसिकांपुढे जिवंत करता यावी,यासाठी प्रचंड मेहनत लागली.एकूण हा सिक्वेन्स खरंच खूप भन्नाट आहे आणि तो शूट करताना आम्ही खूप धमाल केली.”

Also Read:अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन करणार शेती, महाराष्ट्रातील ‘या’ भागात खरेदी केली जमीन!

‘भाभीजी घर पर हैं’ या अतिशय लोकप्रिय मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन लवकरच शेती करताना बघावयास मिळणार आहे. सौम्याने हा निर्णय कुठल्या शोमध्ये नव्हे तर वास्तविक जीवनात घेतला आहे. सौम्या शेती करण्याच्या तिच्या निर्णयाला एक चॅलेंज समजत असून, ती या निर्णयावर खूपच गंभीर आहे. शेतीसाठी सौम्याने महाराष्ट्रातील लवासा येथे जमीन घेतली आहे. याविषयी सौम्याने सांगितले की, मला सुरूवातीपासूनच शेती करण्याची इच्छा होती. मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे मी ते करू शकली नाही. सौम्याने शेती करण्याच्या निर्णयावर म्हटले की, मी माझ्या शेती आणि मातीच्या काही चाचण्या केल्या असून, त्याचा रिजल्ट बघून मी खूपच उत्साहित आहे. 

Web Title: Rohitash Gaur, that is, Manmohan Tiwari, 'Bhabhiji is at home', the ghost got trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.