नीता शेट्टी साकारणार हैदराबादी मुलीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 06:37 AM2018-04-14T06:37:52+5:302018-04-14T12:12:07+5:30

नसबंदीसारख्या अतिशय संवदेनशील विषयाला हात घालून &TV वरील मेरी हानिकारक बीवी या प्रसिद्ध मालिकेने सुरुवातीपासूनच अनेक परंपरा मोडीत काढल्या ...

The role of Hyderabadi girl to fulfill Neeta Shetty | नीता शेट्टी साकारणार हैदराबादी मुलीची भूमिका

नीता शेट्टी साकारणार हैदराबादी मुलीची भूमिका

googlenewsNext
बंदीसारख्या अतिशय संवदेनशील विषयाला हात घालून &TV वरील मेरी हानिकारक बीवी या प्रसिद्ध मालिकेने सुरुवातीपासूनच अनेक परंपरा मोडीत काढल्या आहेत. सध्या या मालिकेत एक वेगळेच नाट्य सुरू आहे. अखिलेश (करण सूचक) आणि इरा (जिया शंकर) यांना एकमेकांविषयीच्या भावनांची जाणीव झाली आहे. मात्र, अखिलेशचा सावत्र भाऊ आदित्य (लक्ष्य खुराणा) याला एक विशिष्ट हेतू मनात ठेवून, अगदी सगळे हिशेब व्यवस्थित मनात जमवून सनायाशी (दिपाली शर्मा) लग्न करण्याची इच्छा आहे. पण, निर्मात्यांनी संपूर्ण घरात बदल घडवून आणणारे नवे पात्र गुल्की आता या मालिकेत आणायचे ठरवले आहे.

गुल्कीचे पात्र रंगवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री नीता शेट्टीची निवड करण्यात आली आहे. शोलेमधील बसंतीप्रमाणेच, ही हैदराबादी मुलगी गुल्की अतिशय मजेशीर आणि बोलकी आहे. बसंती जगण्यासाठी टांगा चालवत होती, तर गुल्कीला जेवण बनविण्यात रस आहे आणि तिची हीच आवड तिच्या उत्पन्नाचे साधन आहे. मालिकेतील आपल्या प्रवेशाबद्दल नीता शेट्टीने सांगितले, “गुल्की ही खूपच फिल्मी आहे आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घडनांकडे ती एक सीन म्हणून बघते. मला पहिल्यांदाच हैदराबादी मुलीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे आणि मी त्याकरिता व्यवस्थित तयारी करत आहे. भाषेचा लहेजा आणि लकब नीट नसेल तर ते पात्र खरे वाटणार नाही, त्यातील आत्माच निघून जाईल. त्यामुळे मी सध्या खूप मेहनत घेते आहे. सध्या आम्ही या पात्राच्या दिसण्यावरदेखील खूप काम करत आहोत कारण इतरांपेक्षा ती काहीतरी वेगळी जाणवायला हवी. मेरी हानिकारक बीवीचा भाग होण्यासाठी मी खरंच आता वाट बघत आहे.” गुल्कीचे मालिकेमध्ये येणे कथेत नक्कीच काहीतरी वेगळे वळण घेऊन येईल असे वाटते आहे. 

Web Title: The role of Hyderabadi girl to fulfill Neeta Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.