'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज'चा विजेता साकारणार ही भूमिका ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 05:39 AM2017-03-21T05:39:52+5:302017-03-21T11:09:52+5:30

छोट्या पडद्यावर लवकरच 'कुलदीपक' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रियालिटी शोचा ...

The role of 'India's Best Dramabazar' will be the winner? | 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज'चा विजेता साकारणार ही भूमिका ?

'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज'चा विजेता साकारणार ही भूमिका ?

googlenewsNext
ट्या पडद्यावर लवकरच 'कुलदीपक' ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रियालिटी शोचा विजेचा वंश महेश्वरी झळकणार आहे. ही मालिका आई आणि मुलाच्या नात्यावर आधारित असणार आहे. आपला मुलगा आदर्शवत असावा असं प्रत्येक आईला वाटत असतं. मात्र जन्माला आलेल्या मुलाला वाईट संगत लागली तर त्या आईचं काय होईल ? वाईट शक्तींच्या तावडीत अडकलेल्या मुलाला त्यातून बाहेर काढण्यासाठी आईची धडपड या मालिकेत दाखवण्यात आली आहे. मराठमोळी अभिनेत्री किर्ती नागपूरे या मालिकेत आईची भूमिका साकारत आहे. मात्र या मालिकेतील बालकलाकाराची निवड करताना निर्मात्यांची चांगलीच कसोटी लागली होती. या मालिकेतील चिराग ही पाच वर्षाच्या मुलाची निवड करताना मालिकेच्या निर्मात्यांची जणू काही झोपच उडाली होती. कारण ही भूमिका साकारणा-या बालकलाकाराचे हावभाव निर्मात्यांना हवे तसे मिळत नव्हते. अखेर मालिकेच्या निर्मात्यांचा शोध वंश महेश्वरीवर येऊन संपला. चिरागची भूमिका साकारण्यासाठी विविध ऑडिशन्स घेण्यात आले. पाच वर्षीय चिराग साकारण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल 45 बालकलाकारांना निवडण्यात आलं. मात्र निर्मात्यांना हवा असलेला चेहरा न मिळाल्याने त्यांनी या सगळ्यांना रिजेक्ट केलं. मात्र वंश महेश्वरीचा चेहरा निर्मात्यांना बघताक्षणीच भावला आणि चिरागची भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी वंशची निवड केली. मालिकेच्या शुटिंगच्या वेळी वंशची धम्माल मस्ती आणि खोड्यांमुळे वातावरण खेळकर बनल्याचं पाहायला मिळते. या मालिकेतून मिळालेली ही मोठी संधी आहे. अभिनय शिकण्यासाठील याचा खूप फायदा होणार असल्याचे आई आपल्याला सांगते असं चिमुकल्या वंशने म्हटलंय. या संधीचा पुरेपूर वापर करण्याचा सल्लाही आईने दिल्याचे तो सांगतो. सेटवरही शुटिंग करताना खूप धम्माल मस्ती करत असल्याचे वंशने सांगितले. सेटवर सगळ्यात लहान असल्याने प्रत्येकजण आपले खूप खूप लाड पुरवत असतो असं सांगायलाही लहानगा वंश विसरला नाही. 

Web Title: The role of 'India's Best Dramabazar' will be the winner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.