झी 5 च्या खार या सिरीजमध्ये हा अभिनेता साकारणार महात्मा गांधींची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 02:59 PM2018-10-01T14:59:40+5:302018-10-02T09:57:21+5:30
झी 5 हे व्यापक डिजिटल मनोरंजन व्यासपीठ खार ही नवी सिरीज सादर करीत आहे. महात्मा गांधी यांच्या भव्य दांडी यात्रेवर आधारित असलेली खार ही सिरीज २ ऑक्टोबरपासून केवळ झी 5 वर प्रसारित होणार आहे.
करणजीत कौर–द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी, लॉकडाऊन, अकूरी, लाल बहादूर शास्त्रीज डेथ–अॅन अनफिनिश्ड स्टोरी या नुकत्याच हिट झालेल्या ओरिजिनल्सच्या यशानंतर झी 5 हे व्यापक डिजिटल मनोरंजन व्यासपीठ खार ही नवी सिरीज सादर करीत आहे. महात्मा गांधी यांच्या भव्य दांडी यात्रेवर आधारित असलेली खार ही सिरीज २ ऑक्टोबरपासून केवळ झी 5 वर प्रसारित होणार आहे.
मिठाचा सत्याग्रह ही कल्पना गांधीजींची होती. याच कल्पनेमुळे स्वातंत्र्यलढ्याचा चेहराच बदलून गेला. यासाठी त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच म्हणावा तितका पाठिंबा मिळाला नव्हता. परंतु, आपण योग्य मार्गाने जात असल्याच्या विश्वासावर गांधीजी ठाम राहिले. दांडी यात्रेपूर्वी गांधीजींना ज्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, त्या सर्व आव्हानांचा धांडोळा खार या सिरीजमध्ये घेण्यात आला आहे. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या काही घटना कारणीभूत ठरल्या त्या सगळ्याचा आढावा या खार सिरीजमध्ये घेण्यात आला आहे. या नाट्यमय डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये सुरेंद्र राजन यांनी महात्मा गांधी यांची भूमिका साकारली असून नेहरूंच्या भूमिकेत संजय गुरबक्षानी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत अमित सिंग ठाकूर, मौलाना आझाद यांच्या भूमिकेत तारकेश चौहान हे कलाकार दिसणार आहेत.
झी 5 च्या खार या सिरीजसाठी कथनकार म्हणून प्रसिद्ध अभिनेते अनू कपूर काम करणार आहेत. या सिरीजमध्ये काम करण्यास ते खूप उत्सुक आहेत. या सिरीजविषयी ते सांगतात, “गांधीजींनी सुरू केलेली दांडी यात्रा ही ब्रिटिशांविरुद्धची महत्वपूर्ण घटना होती आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ही घटना एक मैलाचा दगड ठरली. या मोहिमेमागची खरी कथा आजच्या तरुणांना फारच कमी माहीत आहे. या ध्यासामागचे खरे सत्य समोर आणण्यासाठी झी 5 सारख्या डिजिटल व्यासपीठापेक्षा चांगले माध्यम असूच शकत नाही. या नाट्यमय सिरिजला माझा आवाज देताना मला खूप आनंद होत असून इतक्या रंजक पद्धतीने ऐतिहासिक घटनेचा पुनरानुभव दिल्याबद्दल झी 5 चाही मी आभारी आहे.’’