​शिवांश नव्हे तर हा अभिनेता साकारणार रजनीच्या मुलाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2016 05:45 PM2016-11-18T17:45:10+5:302016-11-18T17:45:10+5:30

बहू हमारी रजनि_कांत ही मालिका फ्रेब्रुवारी महिन्यात पाच वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत यंत्रमानवची भूमिका साकारणाऱ्या रजनीला ...

The role of Rajni's son to act as the actor, not Shivshash | ​शिवांश नव्हे तर हा अभिनेता साकारणार रजनीच्या मुलाची भूमिका

​शिवांश नव्हे तर हा अभिनेता साकारणार रजनीच्या मुलाची भूमिका

googlenewsNext
ू हमारी रजनि_कांत ही मालिका फ्रेब्रुवारी महिन्यात पाच वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत यंत्रमानवची भूमिका साकारणाऱ्या रजनीला एक मुलगा असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रजनीमध्ये ज्याप्रकारे अद्भूत शक्ती आहे, त्याचप्रमाणे तिच्या मुलामध्येदेखील असणार आहे. ही भूमिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नक्षची भूमिका साकारलेला बालकलाकार शिवांश कोटियन साकारणार असल्याचे म्हटले जात होते. पण शेवटच्या क्षणी या मालिकेची टीम आणि शिवांश यांच्यात काहीतरी बिनसले असल्याने तो आता या मालिकेचा भाग असणार नाही. आता या मालिकेत रजनीच्या मुलाची भूमिका आर्यन प्रजापती साकारणार आहे. बडी दूर से आये है या मालिकेत सध्या आर्यन झळकत आहे. पण ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे आता या मालिकेनंतर बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत तो काम करणार आहे. या मालिकेत तो राम ही भूमिका साकारणार असून तो आपल्या आईप्रमाणे म्हणजेच रजनीप्रमाणे म्हणजेच एखाद्या यंत्रमानवाप्रमाणे चालणार, बोलणार आहे. या मालिकेने लीप घेतल्यानंतर मालिकेत रामची भूमिका ही खूप महत्त्वाची असणार आहे. रामला प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टींविषयी प्रश्न विचारून समोरच्याला भंडावून सोडणार आहे. त्यामुळे हा चिमुकला सगळ्यांना खूप त्रास देणार आहे. आर्यन या मालिकेत प्रेक्षकांना एक मुलगा नव्हे तर यंत्रमानव म्हणून दिसणार आहे. विशेष म्हणजे बडी दूर से आये है या मालिकेतदेखील त्याने बाहेरच्या ग्रहावरून आलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. 


Web Title: The role of Rajni's son to act as the actor, not Shivshash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.