​काजोल नच बलियेमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 10:06 AM2017-01-20T10:06:50+5:302017-01-20T10:06:50+5:30

शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी आतापर्यंत छोट्या पडद्यावर काम केले आहे. अभिनेत्रींमध्येही माधुरी ...

In the role of tester in Kajol Nach Baliya | ​काजोल नच बलियेमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

​काजोल नच बलियेमध्ये दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

googlenewsNext
हरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांनी आतापर्यंत छोट्या पडद्यावर काम केले आहे. अभिनेत्रींमध्येही माधुरी दीक्षित, जुही चावला, शिल्पा शेट्टी यांनी छोट्या पडद्यावर आपले भाग्य आजमावले आहे. यांच्याप्रमाणेच काजोलनेदेखील काही वर्षांपूर्वी रॉक अँड रोल फॅमिली या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली होती. या कार्यक्रमात कुटुंबातील सगळे सदस्य मिळून नृत्य करायचे. या कार्यक्रमात तिच्यासोबत तिचे पती अजय देवगण आणि आई तनुजादेखील परीक्षकाच्या भूमिकेत दिसले होते.  
आता अनेक वर्षानंतर काजोल छोट्या पडद्यावर पुन्हा परतणार असल्याची चर्चा आहे. नच बलिये या कार्यक्रमाचा यंदाचा आठवा सिझन आहे. गेल्या सिझनचे विजेतेपद मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचे पती हिमांशू मल्होत्रा यांनी मिळवले होते. आठव्या सिझनची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यंदाच्या सिझनमध्ये काही नवीन परीक्षक पाहायला मिळणार आहेत.
नच बलियेच्या या सिझनचे निर्माते बीबीसी वर्ल्डवाइड आहेत. यंदाचे सिझन अधिकाधिक चांगले होण्यासाठी यंदाच्या सिझनचे परीक्षण करण्यासाठी काजोलला विचारण्यात आले आहे. पण अद्याप तिने यावर काहीही उत्तर दिले नसल्याचे म्हटले जात आहे. काजोल सध्या धनुषसोबत वीआयपी हा तामिळ चित्रपट करत असून याच चित्रपटाच्या चित्रीकरणात ती व्यग्र आहे.
नच बलियेमध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी सेलिब्रेटी आपले उत्कृष्ट नृत्य सादर करत असतात. यंदाच्या सिझनसाठी किश्वर मर्चंट-सुयश राय, हुनार हर्ले-मयांक गांधी, निकितिन धीर, क्रतिका सेनगर, दिपिका कक्कर-शोएब इब्राहिम यांसारख्या सेलिब्रेटी जोडप्यांचा विचार केला जात असल्याची चर्चा आहे. 


Web Title: In the role of tester in Kajol Nach Baliya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.