बेलनवाली बहु लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 09:36 AM2018-01-10T09:36:26+5:302018-01-10T15:06:26+5:30

 एक वेंधळी पण प्रेमळ बहू, तिचा दुर्दैवी नाखूष पती, एक अकार्यक्षम पण आनंदी परिवार आणि त्यात बेलन ची असणारी ...

Rolling out of Bellanwali to the audience soon | बेलनवाली बहु लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बेलनवाली बहु लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
 
क वेंधळी पण प्रेमळ बहू, तिचा दुर्दैवी नाखूष पती, एक अकार्यक्षम पण आनंदी परिवार आणि त्यात बेलन ची असणारी प्रमुख भूमिका, आता तुमच्या रात्री उशीराच्या मनोरंजनामध्ये भर घालणार आहे.  त्याच्या विवेकी प्रेक्षकांसाठी विभिन्न विषयाची निर्मिती करण्यात प्रसिध्द असलेल्या कलर्सने आता एक मनोवेधक निवेदन- बेलनवाली बहू-आणण्याची तयारी केली आहे-जो मानवी इच्छा आणि प्रवृत्तींचे शिखर गाठणारे विनोदी नाट्य आहे. शून्य स्क्वेअर, द्वारा निर्मित हा शो देवेन भोजानी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि धीरज सरना (सह-निर्माता, लेखक आणि प्रमुख अभिनेता) आणि वेद राज यांनी त्याचे संचालन केले आहे. बेलनवाली बहू मध्ये रुपा अवस्थी आणि अमरनाथ या एकमेकाशी न पटणाऱ्या जोडप्याचे जीवन आणि बेलन(लाटणे) सारखी एक सामान्य वस्तू जीवन कसे बदलते कारण त्यांना ते माहित असते याचे वर्णन केलेले आहे. अवस्थी परिवाराच्या या विनोदी कोलांटउड्या सादर होणार आहेत. 

या संकल्पने विषयी बोलताना, कलर्सच्या प्रोग्रमिंग प्रमुख मनीषा शर्मा म्हणाल्या, “प्रत्येक घरात बेलन हा एक महत्वाचा भाग आहे, तेव्हा कृपया, त्याला सहजगत्या घेऊ नका किंवा गृहीत धरु नका. पुरूषांनी बेलन कधी हातात धरलेले नसते पण त्यांना पोळी आवडते. याच संकल्पनेत थोडा विनोदी तडका घालून, बेलनवाली बहू मध्ये अमरनाथचीकथा वर्णन करण्यात आली आहे जो त्याची पत्नी रुपाला नेहमी गृहीत धरतो आणि प्रसिध्द बेलनचे अस्तित्व मात्र त्याच्या साठी काहीच नसते. बेलन हे असे हत्यार आहे जे तुम्हाला खायला घालू शकते किंवा तुम्हाला मारूही शकते, पण आमच्या शो मध्ये ते मारणारे आहे आणि मला खात्री आहे की त्यामुळे प्रेक्षक हसून लोटपोट होणार आहेत. एक मृत पती, त्याची पत्नी आणि बेलन यांच्या जोशपूर्णतेवर प्रकाश टाकणारा हा शो पहिलाच असेल याची आम्ही खात्री देतो.”

 

Web Title: Rolling out of Bellanwali to the audience soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.