एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करायचा, आज आहे लोकप्रिय अभिनेता, नाव वाचून बसेल धक्का
By सुवर्णा जैन | Published: September 22, 2020 06:00 AM2020-09-22T06:00:00+5:302020-09-22T06:00:00+5:30
आमिर खानकडून त्याने या काळात जे काही शिकले ते अजूनही एक शिकवण म्हणून आठवणीत ठेवले आहे. दोन वर्ष रोनित आमिर खानसह काम करत होता. रोनितने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलास केला आहे.
चंदेरी दुनियेती स्ट्रगल कुणालाही चुकलं नाही, तसंच स्ट्रगल टीव्ही अभिनेता रोनित रॉयच्याी वाट्यालाही आलं.सुरूवातीच्या काळात मिळेल ती काम करणा-या रोनितने दोन वर्ष आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणूनही काम केले होते.आमिर खानकडून त्याने या काळात जे काही शिकले ते अजूनही एक शिकवण म्हणून आठवणीत ठेवले आहे. दोन वर्ष रोनित आमिर खानसह काम करत होता. रोनितने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलास केला आहे.
आमिरसह काम करण्याआधी इतरांप्रमाणे आलिशान गाड्या, मोठ मोठे फ्लॅटसमध्ये आरामदायी आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आमिरसह बॉडीगार्ड म्हणून काम करत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यामुळेच आलिशान आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणा-या रोनितच्या विचारशैलीत बदलत गेल्याचे त्याने सांगितले.
'शक्ति' या मालिकेत त्याने पाहुण्या कलाकाराची छोटीशी भूमिकेपासून सुरूवात केली होती. त्यावेळी टीव्ही इतके प्रचलित नव्हते. 'कौन बनेगा करोडपती' सारखे शो आल्यानंतर ख-या अर्थाने रसिकही टीव्हीकडे वळू लागला. त्या आधी मालिका बघण्याचे प्रमाण तसेही फार कमी होते.त्यामुळे किती मालिका आल्या आणि गेल्या कोणालाच फारसे काही देणंघेणं नसायचं.
रोनित रॉयने आपल्या कारकीर्दीत बरेच वर्ष टीव्ही मालिका केल्या तर काही सिनेमांमध्ये काम केले. त्यापैकी 'कसौंटी जिंदगी की' मालिकेतील मि. बजाज आणि 'साँस भी कभी बहु थी' मालिकेतील मिहिर विरानी या भूमिकांनी रोनितला खरी ओळख मिळवून दिली. आजही या भूमिका रसिकांच्या लक्षात आहेत. रोनितला पाहताच आजही चाहते मि. बजाज किंवा मग मिहीर विरानी म्हणूनच जास्त ओळखतात.
नुकताच रोनितने हॉटस्टारवरील 'Hostages 2' वेब सीरिजमध्ये देखील भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेला रसिकांची खूप पसंती मिळाली. रोनितलाही या इंडस्ट्रीत संघर्षांचा सामना करावा लागला आहे. अनेकदा त्याच्या तोंडावर दिग्दर्शक बोलायचे, रोनितला कास्ट करण्यापेक्षा कोण्या ज्युनियर कलाकाराला कास्ट करणे फायद्याचे ठरेल. दिग्दर्शकांचे टोमणे रोनितलाही टोचायचे.
ज्या दिग्दर्शकांनी रोनितला सुरूवातीला नाकारले होते, त्याच दिग्दर्शकानी त्याला एका सिनेमाची ऑफर दिली होती, मात्र यावेळी रोनितने ती ऑफर नाकारली होती कारण सिनेमात काहीच दम नव्हता. अभिनय नेमका कसा करायचा असतो हे आमिर खानकडूनच शिकल्याचे आणि त्याच्या यशाचे श्रेय तो आमिरलाच देतो.