‘दार उघड बये’ मालिकेत सारंगची भूमिका साकारण्यासाठी रोशन विचारे उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 07:00 AM2022-09-21T07:00:00+5:302022-09-21T07:00:07+5:30

रोशन विचारेने आजवर अनेक शो, मालिका आणि चित्रपटामध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पडली आहे.

Roshan is eager to play the role of Sarang in the serial Dar Ughad Baye | ‘दार उघड बये’ मालिकेत सारंगची भूमिका साकारण्यासाठी रोशन विचारे उत्सुक

‘दार उघड बये’ मालिकेत सारंगची भूमिका साकारण्यासाठी रोशन विचारे उत्सुक

googlenewsNext

'दार उघड बये' या नवीन मालिका  १९ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यात शरद पोंक्षे, सुहास परांजपे, किशोरी आंबिये, रुचिरा जाधव’ अशी तगडी कलाकारांची फौज ही या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. वादळवाट नंतर बऱ्याच वर्षांनी शरद पोंक्षे पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहेत. ह्या मालिकेत अभिनेता रोशन विचारे आपल्याला सारंग ही मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. रोशन विचारेने आजवर अनेक शो, मालिका आणि चित्रपटामध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पडली आहे.

या मालिकेबद्दल व आपल्या प्रवासा बद्दल बोलताना रोशन म्हणाला की, 'दार उघड बये’ या मालिकेच्या निमित्ताने मला झी मराठी बरोबर काम करण्याची संधी मिळाली मला फार आनंद होत आहे. या मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल.

या मालिकेबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, मी सारंग नावाची व्यक्तिरेखा या मालिकेत साकारत आहे. आणि तो अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील आहे, ज्याचे आपल्या देशावर खूप प्रेम आहे आणि तो कुटुंबाभिमुख मुलगा आहे, ज्याचे वडील एकदम कडक स्वभावाचे आहेत तरीसुद्धा सारंग त्याचे मत खूप मोकळे पणाने मांडतो आणि मतं मांडत असताना सर्वांचा मान राखला जाईल ह्यासाठी तो प्रयत्नशील आहे. ताश्यास प्रकारे या नव्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर येण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी या भूमिकेसाठी खूप मेहनत घेत आहे जेणेकरून मी प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेन आणि प्रेक्षकांना हा कार्यक्रम आवडेल अशी आशा आहे.”

Web Title: Roshan is eager to play the role of Sarang in the serial Dar Ughad Baye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.