"प्रसिद्धीसाठी सुशांतचं नाव घेणारी..." रोजलिनचा अंकिता लोखंडेवर पलटवार; हिना खानवरुन सुरु झाला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:12 IST2025-02-11T17:12:11+5:302025-02-11T17:12:57+5:30
अंकिता लोखंडे नेमकं काय म्हणाली होती? हा वाद नक्की काय आहे

"प्रसिद्धीसाठी सुशांतचं नाव घेणारी..." रोजलिनचा अंकिता लोखंडेवर पलटवार; हिना खानवरुन सुरु झाला वाद
सध्या टेलिव्हिजन विश्वात एक वाद जोरजार सुरु आहे. अभिनेत्री रोझलिन खानने (Rozlyn Khan) सुरुवातीला हिना खानला लक्ष्य करत ती प्रसिद्धीसाठी कॅन्सरचा वापर करत असल्याचं वक्तव्य केलं. यावर अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तिला 'चीप' असं म्हटलं. आता रोझलिनने अंकितावरही पलटवार केला आहे. अंकितानेही सुशांत सिंह राजपूतच्या बिग बॉसमध्ये फायदाच घेतला असं ती म्हणाली. नक्की काय आहे रोझलिनचं स्टेटमेंट वाचा.
रोजलिन खान एका मुलाखतीत म्हणाली, "अंकिताला या प्रकरणात मध्ये यायची काहीच गरज नव्हती. जर ती हिनाची मैत्रीण आहे तर फक्त मैत्रीसाठी सत्यता न पडताळता ती कोणाचीही साथ देणार का? अंकिताला कॅन्सरस बद्दल माहितच काय आहे? स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायवरपेक्षा तिला जास्त माहित आहे का?"
ती पुढे म्हणाली, "अंकिताला तर नेहमीच प्रसिद्धीची हाव होती. बिग बॉसमध्येही तिची काही वेगळी ओळख नव्हती. म्हणून तिने सुशांतचं नाव नॅशनल टेलिव्हिजनवर घ्यायला सुरुवात केली. जेव्हा ती आपल्या पतीसोबत शोमध्ये होती तर मग सुशांतचं नाव घेण्याची गरज काय? आता हिनाच्या समर्थनात बोलून ती फक्त प्रसिद्धीझोतात यायचा प्रयत्न करत आहे." रोजलिन खानने स्वत: काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात केली आहे.
अंकिता नेमकं काय म्हणाली होती?
अंकिता लोखंडने याआधी रोझलिनने हिनाविरोधात केलेल्या वक्तव्यांवर भाष्य केलं होतं. तिने रोजलीनच्या एका मुलाखतीचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले, "कोणी इतकं कसं पातळी गाठू शकतं? हे खूपच चीप आहे. हिना हिंमतीने आजाराचा सामना करत आहे आणि मला हे चांगलं माहित आहे. विकी काही दिवसांपूर्वीच हिनाला रुग्णालयात जाऊन भेटून आला जिथे तिची किमोथेरपी सुरु होती. रॉकीही तिथेच होता. विकी मला म्हणाला की हिनाला अशा अवस्थेत बघून त्याला रडू येत होतं. हिना, तू स्ट्राँग आहेस आणि नेहमी राहशील."