‘रबर बॉय’ तनयचे डान्स पॅशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 11:17 AM2016-09-11T11:17:49+5:302016-09-11T16:47:49+5:30

डान्स म्हणजे माझे पॅशन, माझा जीव की प्राण. डान्स म्हणजे स्वत:ला एक्स्प्रेस करण्याचे माध्यम आहे. लहानपणापासून असलेल्या ‘डान्स’च्या या ...

'Rubber Boy' Tanse Dance Passion! | ‘रबर बॉय’ तनयचे डान्स पॅशन!

‘रबर बॉय’ तनयचे डान्स पॅशन!

googlenewsNext
न्स म्हणजे माझे पॅशन, माझा जीव की प्राण. डान्स म्हणजे स्वत:ला एक्स्प्रेस करण्याचे माध्यम आहे. लहानपणापासून असलेल्या ‘डान्स’च्या या वेडापायी मला आज रेमो डीसूझांचे मार्गदर्शन लाभतेय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हे उद्गार आहेत तनय मल्हाराचे. ‘डान्स प्लस २’ या रिअ‍ॅलिटी शोच्या अंतिम फेरीत प्रथम निवड होण्याचा त्याला बहुमान मिळालेला आहे. मूळ जळगावचा राहणाऱ्या तनयने 'सीएनएक्स’ सोबत त्याची डान्सिंग जर्नी शेअर केली.

डान्स ड्रीम

आईच्या प्रोत्साहनामुळे तनयने डान्स क्लास लावला. नृत्यशिक्षकाने मग त्याच्यातील गुण हेरून त्याला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. त्याने ‘डान्स प्लस’च्या पहिल्या सीझनसाठीदेखील आॅडिशन दिली होती. त्यावेळी तो सिलेक्ट नाही झाला; परंतु न खचता त्याने अधिक जोमाने सराव करून दुसऱ्या सीझनमध्ये दाखल झाला. देशभरातून आलेल्या विविध डान्सरसोबत त्याला रेमो डीसूझा, प्रभू देवा, हृतिक रोशन अशा दिग्गजांसमोर परफॉर्म करण्याची, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी लाभली.

रबर बॉय

‘कंटेम्पररी’ हा तनयचा सर्वात आवडता नृत्यप्रकार. तो नाचत असताना त्याची लवचिकता पाहून त्याच्या शरीरात हाडे आहेत की नाही असा प्रश्न पडतो. प्रभू देवाने तर त्याचे नाव ‘रबर बॉय’ असेच ठेवले आहे. तनय केवळ उत्कृष्ट डान्सर नसून तो योगादेखील करतो. मंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय योगा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले.

मिसिंग जळगाव

गेली तीन महिने तो घरी म्हणजे जळगावला गेलेला नाही. त्यामुळे सध्या त्याला घरची जबरदस्त ओढ लागलेली आहे. तो सांगतो, ‘माझ्यासाठी जळगावची सर मुंबईला कधीच येणार नाही. माझी शाळा, माझे आई-वडील, माझे सर्व मित्र तेथे राहतात. त्यांना मी खूप मिस करतो. आता डान्स प्लस जिंकूनच घरी जाण्याचा मी निर्धार केला आहे.’

डान्समध्येच करिअर

सध्या नववीत शिकणाऱ्या तनयला पुढे चालून नृत्याच्या क्षेत्रातच करिअर करायचे आहे. त्याबरोबरच त्याला अभिनय आणि अँकरिंगदेखील करायची आहे. तो सांगतो, डान्सची आवड जोपासून मला शिक्षण करायचे आहे. मी स्वत:ला फार भाग्यवान मानतो की, माझ्या कुटुंबियांचा मला संपूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी नेहमीच मला प्रेरणा दिली आहे.

Web Title: 'Rubber Boy' Tanse Dance Passion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.