‘छोटी बहू’ फेम रुबिना दिलैकने फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंसी ग्लो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 03:48 PM2023-09-26T15:48:07+5:302023-09-26T15:49:36+5:30
रुबिना आणि अभिनव लवकरच आईबाबा होणार आहेत.
‘छोटी बहू’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुबिना दिलैक लवकरच आई होणार आहे. अलिकडेच तिने आपली प्रग्रेंन्सीची बातमी कन्फर्म केली. रुबिनाने पती अभिनव शुक्लाबरोबरचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. या फोटोमध्ये रुबिनाने बेबी बंपही फ्लाँट केलं होतं. रुबिना आणि अभिनव लवकरच आईबाबा होणार आहेत. छोट्या पाहुण्याला वेलकम करण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत. यादरम्यान रुबिनाने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत
‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘इश्क मे मरजावा’, ‘नमक इश्क का’, ‘सास बिना ससुराल’, ‘तू आशिकी’ अशा अनेक मालिकांमध्ये रुबिनाने काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुबिना गरोदर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अभिनेत्री स्वत: ही गुडन्युज चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता रुबीनाने शेअर केलेल्या फोटो तिच्या चेहऱ्यावर आलेला प्रग्नेंन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसतो आहे.
रुबिना दिलैकने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे. या आउटफिटमध्ये तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले, “Mamacado hashtag vibes.” रुबिनाच्या या फोटोंवर केवळ तिचे चाहतेच नाही तर टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींही कमेंट्स केल्या आहेत..
रुबिना आणि अभिनव शुक्लाने २०१८मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. ‘बिग बॉस १४’मध्ये ते दोघं सहभागी झाले होते. या पर्वाची रुबिना विजेतीही ठरली होती. रुबिना आणि अभिनव घटस्फोट घेत विभक्त होण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, ‘बिग बॉस’मुळे त्यांच्यातील वाद मिटले आणि त्यांनी वेगळं न होण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आईबाबा होणार असल्यामुळे ते आनंदी आहेत.