विकी कौशलबरोबर चित्रपटात रुख्सार रेहमान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 04:15 AM2018-06-06T04:15:53+5:302018-06-06T09:45:53+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत भूमिका साकारणारी रुख्सार रेहमान ही लोकप्रिय अभिनेत्री आता हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका रंगविणार ...
‘ ्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत भूमिका साकारणारी रुख्सार रेहमान ही लोकप्रिय अभिनेत्री आता हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका रंगविणार आहे. ही अभिनेत्री लवकरच दोन महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसेल. विक्की कौशलबरोबर ‘उरी’ या चित्रपटात, तसेच ऋषी कपूर आणि इम्रान हाश्मीबरोबर ‘द बॉडी’ या चित्रपटात. रुख्सार म्हणाली, “मी ज्या भूमिका रंगविते, त्यांच्यात मी पूर्णपणे एकरूप होते आणि इतके उत्तम चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका उभी करण्याची संधी मिळताच माझ्या अंगात वीज सळसळते. ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही मालिका तसंच हे दोन आगामी चित्रपटांमध्ये भूमिका उभ्या करण्याच्या कल्पनेने मी हरखून गेले आहे. आता टीव्ही मालिका आणि चित्रपट यांच्या चित्रीकरणाच्या वेळा सांभाळताना माझी धावपळ उडणार आहे. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही.”
रूखसार यांची व्यक्तिरेखा मदीहा ही एक शिस्तप्रिय आई असून तिला आपली मुलगी मरियम हिला शिस्त लावायची आहे. खऱ्या आयुष्यातही रूख्सार यांना मुलगीच आहे. आई मुलीच्या नात्याबद्दल रूखसार म्हणाल्या, “पालक म्हणून आपण आपल्या मुलांसोबत संतुलन साधायला हवे यावर माझा विश्वास आहे. शिस्त राखा पण तेवढेच त्यांच्यासोबत शांतपणे आणि मैत्रीपूर्ण पद्धतीनेही वागा. कुठल्याही बाबतीतील टोकाचे वागणे हे मुलांना आक्रमक किंवा बुजरे बनवू शकते. त्यामुळे संतुलन गरजेचे आहे.” मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान या दिग्गज कलाकारांची मातृभाषा उर्दू असल्याने त्यांनी ती मालिकेतील अन्य कलाकारांना या मालिकेसाठी ही भाषा शिकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान हे जुन्या नबाबी घराण्यातील असल्याचे दाखवण्यात आले आहे.