रुपाली गांगुली सोडतेय 'अनुपमा'?, अभिनेत्री म्हणाली - "माझ्यासाठी ही फक्त एक मालिका.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:59 IST2025-01-06T15:58:00+5:302025-01-06T15:59:19+5:30
Rupali Ganguly: 'अनुपमा' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली हिने नुकतेच मालिका सोडण्याच्या चर्चेवर मौन सोडले आहे.

रुपाली गांगुली सोडतेय 'अनुपमा'?, अभिनेत्री म्हणाली - "माझ्यासाठी ही फक्त एक मालिका.."
'अनुपमा' (Anupama Serial) मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिने नुकतेच मालिका सोडण्याच्या चर्चेवर भाष्य केले. या शोने १५ वर्षांची लीप घेतली आहे हे सर्वांनाच माहीत आहे, त्यानंतर रुपाली गांगुली देखील मालिका सोडू शकते असा अंदाज काही लोक वर्तवत आहेत. यावर ती म्हणाले की, या अफवा लोक जास्त विचार करतात, त्यामुळे पसरत आहे. एजेंसीनुसार, रुपाली म्हणाली की अनुपमा तिच्यासाठी फक्त एक मालिका नाही तर एका कुटुंबासारखी आहे.
रुपाली गांगुली म्हणाली, मी हे माझे घर मानते आणि ते सोडण्याचा प्रश्नच येत नाही. माझे पती आणि मी दोघांचा असा विश्वास आहे की राजनजींनी मला जे काही दिले आहे, ओळख, व्यासपीठ, स्थान, ते खूप आहे. ‘अनुपमा’ हा माझ्यासाठी फक्त शो नाही; ही एक भावना आहे, हे माझे घर आहे, माझे दुसरे घर आहे, माझी सर्व प्रिय मुले येथे आहेत आणि एकता एका कुटुंबासारखी झाली आहे. मग, कोणी स्वतःचे कुटुंब, घर सोडून जातो का? आणि देव करो असे आयुष्यात कधीही होऊ नये. ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांना मी सांगू इच्छिते की माझा शो पाहत रहा. मालिका सुरूच राहील. मी ही मालिका सोडणार नाही.
राजन शाही यांनीही दिली प्रतिक्रिया
शोचे निर्माते राजन शाही यांनीही या अफवेवर भाष्य केले आणि ते म्हणाले, ''मी पूर्ण समर्पण आणि उत्कटतेने कठोर परिश्रम करत राहीन. हा प्रवास वर्षानुवर्षे असाच चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पण ही फक्त सुरुवात आहे, माझ्या मित्रांनो अजून बरेच काही करायचे आहे. म्हणून प्रेम करत राहा आणि मी तुमच्या कौतुकास पात्र होण्यासाठी कठोर परिश्रम करीन.'' ते पुढे म्हणाले की, ''सर्वांचे आभार, अफवांवर लक्ष देऊ नका. त्यांच्यात अजिबात तथ्य नाही.''
अगदी सुरुवातीपासूनच, ‘अनुपमा’ हा खऱ्या भावना आणि नातेसंबंधांची खोली टिपणारा शो आहे आणि त्याचे यश हे आमच्या कलाकार आणि क्रू यांच्या मेहनतीमुळे तसेच आमच्या चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे आहे. कधी एखादी मोठी गोष्ट शेअर करायची असेल तर आम्ही तुम्हाला थेट सांगू.