एस एस राजामौलींचा 1000 कोटींचा बिग बजेट सिनेमा, मुख्य अभिनेता करणार फुकटात काम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:44 IST2024-01-29T16:29:49+5:302024-01-29T16:44:20+5:30
1000 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमातील मुख्य अभिनेता एकही फीस घेणार नाही.

एस एस राजामौलींचा 1000 कोटींचा बिग बजेट सिनेमा, मुख्य अभिनेता करणार फुकटात काम!
बाहुबली आणि RRR असे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्सक SS राजामौली (S S Rajamouli) त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. राजमौलींचा पुढचा सिनेमा ज्याचं टायटल अद्याप ठरलेलं नाही. मात्र सध्याला सिनेमा एमएसएमबी 29 नावाने ओळखलं जातं. याच सिनेमाबाबतीत आता नवीन अपडेट समोर आली आहे. 1000 कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमातील मुख्य अभिनेता एकही फीस घेणार नाही. तसंच अभिनेत्याने सिनेमासाठी त्याचे 3 वर्ष दिले आहेत. कोण आहे तो अभिनेता?
एसएस राजामौली यांच्या आगामी 'एसएसएमबी 29' सिनेमाबद्दल दिवसेंदिवस अनेक अपडेट समोर येत आहेत. सिनेमाचं बजेटच तब्बल 1000 कोटी असणार आहे. विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया' च्या रिपोर्टनुसार या सिनेमासाठी मुख्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) सिनेमाचं काम संपेपर्यंत एकही पैसा घेणार नसल्याचं बोललं जात आहे.निर्मात्यांवर सिनेमा बनवताना कोणताही आर्थिक दबाव येऊ नये म्हणून महेश बाबूने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर महेश बाबू स्वत: सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक असेल. अर्थात या सर्व गोष्टींची सध्या केवळ चर्चा सुरु आहे अद्याप मेकर्सकडून यावर अधिकृत तपशील आलेले नाहीत.
महेश बाबू सध्या सिनेमाच्या तयारीसाठी जर्मनीला रवाना झाला आहे. तिथे तो एका जर्मन डॉक्टरकडून विशेष शारिरीक प्रशिक्षण घेत आहे. महेष बाबू आणि राजामौली दोघंहीव अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे दोघांकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे. सिनेमाची स्क्रीप्ट राजामौली यांचे वडील व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे.