'सा रे ग म प'चा स्पर्धक कार्तिक कृष्णमूर्तीने नागालॅण्डच्या मंत्र्यांना केलं प्रभावित!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:15 PM2023-09-07T19:15:47+5:302023-09-07T19:16:29+5:30

चेन्नईच्या कार्तिक कृष्णमूर्तीच्या गाण्यावर केवळ परीक्षक आणि अन्य स्पर्धकच नव्हे, तर नागालॅण्डचे पर्यटन आणि उच्चशिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलाँग हेही प्रभावित झाले.

Sa Re Ga Ma Pa contestant Kartik Krishnamurthy impresses Nagaland’s Minister! | 'सा रे ग म प'चा स्पर्धक कार्तिक कृष्णमूर्तीने नागालॅण्डच्या मंत्र्यांना केलं प्रभावित!

'सा रे ग म प'चा स्पर्धक कार्तिक कृष्णमूर्तीने नागालॅण्डच्या मंत्र्यांना केलं प्रभावित!

googlenewsNext

सा रे ग म प (Sa Re Ga Ma Pa Show) या कार्यक्रमाचा नवा सीझन दणक्यात सुरू झाला असून त्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत गुणी स्पर्धकांचा समावेश झाला आहे. असाच एक गुणी स्पर्धक आहे चेन्नईचा कार्तिक कृष्णमूर्ती. त्याच्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात त्याने गायलेल्या ‘ओ रे पिया’ या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध करन सोडले आहे. ऑटिसिझम या विकाराने ग्रस्त असल्याने आपल्याबद्दल लोक काय म्हणतात, ते त्याला कळत नाही. त्याला ते समजावून सांगणे हेही एक आव्हान आहे. असे असले, तरी कार्तिक अफलातून गाणे गायला असून त्यामुळे त्याची निवड मेगा ऑडिशन फेरीसाठी झाली. इतकेच नव्हे, तर त्याच्या गाण्याने केवळ परीक्षक आणि अन्य स्पर्धकच नव्हे, तर नागालॅण्डचे पर्यटन आणि उच्चशिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलाँग हेही प्रभावित झाले. त्यांनी कार्तिकच्या गाण्याचा हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, माझ्या अंगावर शहारे आले!. 

कार्तिकच्या गाण्याने प्रभावित झालेला परीक्षक अनु मलिक म्हणाले, माझ्या मते, कार्तिक हा एक अभिजात गायक असून त्याच्या अशा शारीरिक स्थितीतही त्याने इतकी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परमेश्वराने कार्तिकला काही गोष्टी दिलेल्या नसल्या, तरी त्याबदल्यात त्याने त्याला काही खास गोष्टी दिल्या आहेत. मला आज त्याचं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. त्याचं गाणं ऐकून दुसऱ्यांना प्रेरणा मिळते. त्याच्याकडे पाहून आपल्यालाही जीवनात विधायक दृष्टी ठेवून पुढे जाण्याचं धैर्य मिळतं. मी त्याच्या आई-वडिलांचं विशेष कौतुक करतो कारण त्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांना खूप त्याग करावा लागला आहे. कार्तिकचा आत्मा शुध्द आहे. आपण नेहमी म्हणतो की आपण देवाला पाहिलेलं नाही. पण त्याला भेटल्यावर मी जेव्हा जेव्हा त्याच्याजवळ जातो, तेव्हा मला मला परमेश्वराचं अस्तित्त्व जाणवतं. 


हिमेश रेशमिया म्हणाला, कार्तिक, तू आणि तुझं संगीत हे महान आहे. तू जे गाणं निवडलंस, ते म्हणायला खूप अवघड आहे. पण तू ते अचूक सूर आणि तालात गायलास. तुझं गाणं ऐकताना ते फारच सोपं वाटत होतं. तू परमेश्वरी चमत्कार आहेस आणि आपल्यात किती मोठी क्षमता आहे, याची बहुदा तुला जाणीवच नाही, असं मला वाटतं. मी त्याच्या आई-वडिलांचं विशेष कौतुक करतो कारण त्याला इथपर्यंत आणण्यासाठी त्यांना खूप त्याग करावा लागला आहे. सा रे ग म प हा कार्यक्रम फार भाग्यवान आहे, कारण त्याला तू सापडलास. 
राष्ट्रीय संगीताच्या व्यासपिठावर कार्तिकसारख्या एका ऑटिस्टिक स्पर्धकाची झालेली निवड ही या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी एक आशेचा किरण आहे. मनाचा ठाम निर्धार असेल, तर आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मार्ग निश्चितच सापडतो, हे त्याने सिध्द केले आहे.  

Web Title: Sa Re Ga Ma Pa contestant Kartik Krishnamurthy impresses Nagaland’s Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.