'एकदम कडक' कार्यक्रमात रंगणार सामना महाराष्ट्राचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 06:30 AM2019-02-25T06:30:00+5:302019-02-25T06:30:00+5:30
महाराष्ट्रातील लोककलांच्या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी 'एकदम कडक' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली.
महाराष्ट्रातील लोककलांच्या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी 'एकदम कडक' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलाकार आपली कला सादर करत आहेत. त्यांच्या जोडीला आहेत प्रसिद्ध विनोदवीर ज्यांची खुशखुशीत विनोदशैली, अतरंगी पात्रे, खुमासदार विनोदांची मेजवानी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत आहेत.
'एकदम कडक'च्या येत्या आठवड्यामधील भागामध्ये रंगणार आहे सामना ढोलकी – घुंगरू, काव्य आणि कव्वाली मध्ये... प्रेक्षकांना काही खास परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत. शास्त्रीय गायन, भजन, धम्माल स्कीट अशी मनोरंजनाची पर्वणी 'एकदम कडक' या कार्यक्रमाच्या पुढील आठवड्यामधील भागांमध्ये बघायला मिळणार आहे.
'एकदम कडक'च्या भागामध्ये कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी अप्रतिम कथ्थक सादर केले तर आनंद शिंदे यांनी कव्वाली सादर केली. आनंद भाटे आणि रघुनंदन पणशीकर यांनी अत्यंत सुंदर शास्त्रीय गायन सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कीर्ती किल्लेदार आणि विश्वजितने 'कोण होतीस तू काय झालीस तू' हे गाणे सादर केले. ढोलकीच्या तालावर पर्व तिसरेची विजेती मीनाक्षी पोशे आणि याच कार्यक्रमाची फाइनलिस्ट धनश्री ढोमसे या दोघींनी लावणी सादर केली. याचबरोबर सुजाता कुंभार आणि प्राजक्ता या दोघींनी देखील लावणी सादर केली. या परफॉर्मन्स बरोबरच धम्माकेदार स्कीट देखील सादर झाले. तेव्हा नक्की बघा एकदम कडक सोमवार ते बुधवारी रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.