...म्हणून अभिषेकने लग्नानंतर बदललं पत्नीचं नाव, म्हणाला- "ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:20 IST2024-12-14T16:17:13+5:302024-12-14T16:20:09+5:30
अभिषेकने लग्नानंतर पत्नी सोनालीचं नाव बदललं आहे. अभिषेकने पत्नीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. लग्नानंतर नाव का बदललं? याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला.

...म्हणून अभिषेकने लग्नानंतर बदललं पत्नीचं नाव, म्हणाला- "ती आल्यानंतर माझ्या आयुष्यात..."
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकरने रिलस्टार सोनाली गुरवसोबत २६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लग्नानंतर अभिषेक आणि सोनालीने लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये हजेरी लावली होती.
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक आणि सोनालीने दिलखुलास गप्पा मारल्या. अभिषेकने लग्नानंतर पत्नी सोनालीचं नाव बदललं आहे. अभिषेकने पत्नीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. लग्नानंतर नाव का बदललं? याचा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला.
अभिषेकने का ठेवलं सोनालीचं वामिका नाव?
सोनाली म्हणाली की, वामिका हे नाव अभिषेकला खूप आवडलं आणि तो म्हणाला की माझ्या मुलीचे नाव हे ठेवणार. वामिकाचा अर्थ होतो लक्ष्मी. नंतर एक दिवस त्यालाच असे वाटले की, सोनाली तू माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप लक्ष्मी आली. त्यामुळे लग्नानंतर तुझे नाव वामिका ठेवूयात.
त्यावर अभिषेक म्हणाला की, तिला आधी मी विचारले की लग्नानंतर तुला नाव बदलायचे आहे का? ती म्हणाली की, जर बदलायचे असेल तर चांगलं नाव सुचव जर आवडलं तर नक्कीच नाव बदलेन. तेव्हा मी तिला वामिका नावाबद्दल सांगितले आणि तिचे हे नाव का ठेवायचे तेही सांगितलं. तर तिला हे नाव आवडलं आणि सोनालीची वामिका झाली.