'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची निवेदिता सराफ यांच्या मालिकेत एन्ट्री, 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत'चा नवा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2024 11:12 AM2024-12-05T11:12:25+5:302024-12-05T11:13:00+5:30
'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री झाली आहे.
स्टार प्रवाहवर 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आहे. रिटायरमेंटनंतरचं आयुष्य निवांत आणि एकांतात जगण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्याची गोष्ट या मालिकेतून दाखविण्यात येणार आहे. या मालिकेत निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता सारं काही तिच्यासाठी फेम अभिनेत्रीची या मालिकेत एन्ट्री झाली आहे.
'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत निवेदिता सराफ शुभा किल्लेदार आणि मंगेश कदम यशवंत किल्लेदार या भूमिकेत आहेत. आता मालिकेत शुभा आणि यशवंत यांचा छोटा मुलगा मकरंदची एन्ट्री होणार आहे. अभिनेता आदिश वैद्य ही भूमिका साकारताना दिसणार आहे. आदिशसोबतच सारं काही तिच्यासाठी मालिकेतील अभिनेत्रीचीही या मालिकेत एन्ट्री होणार आहे. सारं काही तिच्यासाठी मालिकेत चारू ही भूमिका साकारलेली अभिनेत्री पालवी कदम 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेत दिसणार आहे.
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मकरंदला पाहून शुभा आणि यशवंत खूश होतात. पण, मकरंद त्याच्याबरोबर एका मुलीलाही घेऊन येत असल्याचं दिसत आहे. मकरंदसोबत आलेली ही मुलगी कोण, असा प्रश्न किल्लेदार कुटुंबीयांना पडला आहे. त्यानंतर शुभा मकरंद आणि त्या मुलीला रुममध्ये एकत्र बघते. त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मकरंदसोबत आलेली ही मुलगी स्वीटी किल्लेदार आहे. 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' मालिकेत पालवी स्वीटीची भूमिका साकारताना दिसणार आहे.