रिअल लाईमध्ये बोल्ड असलेल्या अभिनेत्रीसमोर निर्मात्यांनी ठेवली होती 'अट', इच्छा नसूनही करावी लागली 'ती' गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 02:23 PM2020-10-06T14:23:52+5:302020-10-06T14:24:30+5:30
'साथ निभाना साथ 2' ही मालिका लवकरच स्टार प्लस वाहिनीवर सुरु होणार आहे. या नवीन पर्वात गोपी बहू (देवोलीना भट्टाचार्य) आणि कोकिलाबेन (रूपल पटेल) यांच्या व्यतिरिक्त काही नवीन चेहरेदेखील दिसणार आहेत.
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे विविध अंदाजातील ग्लॅमरस फोटो चाहत्यांसह शेअर होतात. हीच गोष्ट अभिनेत्री स्नेहा जैन करू नये म्हणून निर्मात्यांनी तिच्यासमोर एक अट ठेवली होती. स्नेहा जैन लवकरच 'साथ निभाना साथ 2' मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे मालिका सुरू होण्यापूर्वी तिला तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचे सांगितले गेले. तिनेही निर्मांत्यांची अट मान्य करत तिचे सोशल मीडियावरील अकाऊंट डिलिट केले आहे.
स्नेहा जैन साकारत असलेले मालिकेतील तिचे पात्र घरकाम करणा-या एका सामान्य मुलीचे आहे. हे पात्र अधिक वास्तविक दिसण्यासाठी अभिनेत्रीला असे करण्यास सांगितले गेले होते. ऑनस्क्रीन ती ग्लॅमरस दिसणार नाही. ख-या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. त्यामुळे चाहते सोशल मीडियावरील तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहून मालिकेतील लूकसह तुलना करतीलच. तसेच ही भूमिका परफेक्ट वाटावी, सुरूवातीपासून रसिकांंनीही मालिकेतील कोणत्याच भूमिकेबद्द नापसंती दर्शवू नये यासाठी ही सगळी खबरदारी घेतली गेल्याचे सांगण्यात येत आहे.
'साथ निभाना साथ 2' ही मालिका लवकरच स्टार प्लस वाहिनीवर सुरु होणार आहे. या नवीन पर्वात गोपी बहू (देवोलीना भट्टाचार्य) आणि कोकिलाबेन (रूपल पटेल) यांच्या व्यतिरिक्त काही नवीन चेहरेदेखील दिसणार आहेत. या मालिकेत गहना हे एक नवीन पात्र जोडले गेले आहे. गहना ही भूमिका स्नेहा जैन साकारणार आहे. हर्ष नागर हा अनंतची व्यक्तिरेखा साकारत असून तो अमेरिकेहून परतलेला असतो.तसेच मालिकेमध्ये गहना आणि अनंतची लव्ह स्टोरी बघायला मिळणार आहे.
24 ऑक्टोबरपासून 'साथ निभाना साथ 2' ही मालिका सुरू होणार आहे.'साथ निभाना साथिया'चा पहिला सीझन 2010 मध्ये सुरू झाला आणि 2017 मध्ये तो संपला. या सिझनलाही रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती. सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. त्यामुळे नवीन सिझनही पु्न्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार का हे पाहणे रंजक असणार आहे.