सचिन तेंडुलकर खूश झाला इंडियन आयडलच्या थुपटेन सेरिंग या स्पर्धकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 03:42 PM2016-12-28T15:42:00+5:302016-12-28T15:52:18+5:30
इंडियन आयडलचे यंदाचे नववे सिझन आहे. हे सिझन सुरू होऊन केवळ काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूप चांगला ...
इ डियन आयडलचे यंदाचे नववे सिझन आहे. हे सिझन सुरू होऊन केवळ काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज खूप छान असल्याने हे स्पर्धक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पण याहीपेक्षा या सिझनच्या परीक्षकांमुळे लोकांची या कार्यक्रमाला अधिक पंसती मिळत आहे.
इंडियन आयडलच्या पहिल्या सिझनमध्ये अन्नू मलिक, सोनू निगम आणि फराह खान यांनी परीक्षकाची भूमिका बजावली होती. यंदाच्या सिझनमध्ये अनेक वर्षांनंतर हे तिघे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. प्रेक्षकांना या तिघांची केमिस्ट्री खूपच आवडत आहे.
या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे प्रेक्षपण झाल्यापासून ट्विटर या सोशल नटवर्किंग साईटला या कार्यक्रमाचे कौतुक करणारे अनेक ट्वीट नेटकरी करत आहेत. या ट्वीट करण्यामध्ये एक स्पेशल व्यक्तीदेखील आहे. इंडियन आयडलच्या एका स्पर्धकाचे कौतुक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिनला या कार्यक्रमात थुपटेन सेरिंगने सादर केलेला पहिला परफॉर्मन्स खूपच आवडला. शारीरिक अपंगत्व असूनही थुपटेनने केवळ परीक्षकांनाच नाही तर सचिन तेंडुलकरलाही आपल्या आवाजाचा फॅन बनवले आहे. सचिनने थुपटेनचा परीक्षकांसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यासोबत एक ट्वीटदेखील त्याने केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने म्हटले आहे की, हा व्यक्ती खूपच खास आहे. अपंगत्व असूनही तो अतिशय सकारात्मक आहे. त्याच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. त्याला देवाने अधिक बळ देऊ दे.