सागर कारंडे रुग्णालयात आणि 'हीच तर फॅमिलीसाठी धावून आली वासूची सासू', काय घडले बघा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 09:48 AM2022-11-23T09:48:49+5:302022-11-23T09:50:28+5:30
सागर कारंडेची तब्येत बिघडली आणि नाटकाचा प्रयोग करावा लागला. पण त्याच्या मदतीसाठी दुसऱ्याच नाटकाचे कलाकार धावून आले.
मराठीनाटकावर कलाकार आणि रसिकांचे प्रचंड प्रेम आहे. कलाकार एका दिवसात ३ ३ प्रयोगही करतात. मात्र अनेकदा त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होते. तब्येतच ठीक नसेल तर नाईलाजाने प्रयोग रद्द कारावा लागतो. मात्र अशा वेळेस इतर कलाकार कसे मदतीला धावून येतात याचा प्रत्यय सागर कारंडेला आला आहे.
'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेने फेसबुक वर लाईव्ह येत एक घटना शेअर केली आहे. २० नोव्हेंबरला सागरच्या छातीत दुखु लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सागरचा दुपारी साडेचार वाजता मराठी साहित्य संघला 'हीच तर फॅमिलीची गंमत आहे' या नाटकाचा प्रयोग होता.तर २ वाजता सागर रुग्णालयात होता. त्याला प्रयोग करता येणे शक्यच नव्हते. तर दुसरीकडे वेळेच्या कारणामुळे प्रयोग रद्द होऊ शकत नव्हता. नाटक अशा समस्येत सापडले आहे हे कळल्यावर .यावर उपाय म्हणून अचानक 'वासूची सासू' या नाटकाचा प्रयोग जाहीर करण्यात आला. वासूची सासू मधील सर्व कलाकार अगदी धावत पळत नाटकाला आले आणि प्रयोग यशस्वी झाला. हा किस्सा सागरने सविस्तर सांगितला आहे.
सागरची तब्येतही आता बरी असल्याची माहिती त्याने दिली आहे. रात्रीचे शूटिंग, प्रयोग, वेळी अवेळी जेवण यामुळे त्याच्या शरीरावर परिणाम झाला. अॅसिडिटी झाली. त्यामुळे त्याच्या छातीत अचानक दुखायला लागले. सर्व टेस्ट केल्या असून त्याचे रिपोर्टही नॉर्मल आले आहेत.
मराठी नाटक कलाकार कशा पद्धतीने एकमेकांना सहकार्य करतात, मदतीसाठी कोणत्याही परिस्थितीत धावून जातात हे पुन्हा सिद्ध झाले. शो मस्ट गो ऑन असे म्हणतात त्याचा प्रत्ययही या घटनेतुन येतो.