साहिबा उर्फ ​​हिमांशी पराशरने 'तेरी मेरी डोरियां'मधील लग्नाच्या सीक्वेन्सबद्दल केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:33 PM2023-02-12T18:33:36+5:302023-02-12T18:34:11+5:30

स्टार प्लसचा बहुचर्चित शो 'तेरी मेरी डोरियां' चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Sahiba aka Himanshi Parashar opens up about the wedding sequence in 'Teri Meri Doriyan' | साहिबा उर्फ ​​हिमांशी पराशरने 'तेरी मेरी डोरियां'मधील लग्नाच्या सीक्वेन्सबद्दल केला खुलासा

साहिबा उर्फ ​​हिमांशी पराशरने 'तेरी मेरी डोरियां'मधील लग्नाच्या सीक्वेन्सबद्दल केला खुलासा

googlenewsNext

स्टार प्लसचा बहुचर्चित शो 'तेरी मेरी डोरियां' चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील प्रत्येक भागामध्ये आलेल्या एकाहून एक ट्विस्टने सर्वांनाच उत्साहित केले आहे. कथानकात येणाऱ्या अशा अनेक ट्विस्टमुळे प्रेक्षकांच्या मालिकेच्या निर्मात्यांकडून अपेक्षा वाढल्या असून शोच्या नवीन प्रोमोमध्ये सीरतच्या आयुष्यात आणखी एक रंजक ट्विस्ट येणार असल्याची चर्चा आहे.

स्टार प्लसचा शो 'तेरी मेरी डोरियां'चा बहुप्रतिक्षित प्रोमो रिलीज झाला आहे. अंगदच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण म्हणजे त्याचे लग्न, पण तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण कथेत एक ट्विस्ट आहे, खरं तर, शोमध्ये सीरतऐवजी साहिबा अंगदसोबत लग्नमंडपात उपस्थित असेल कारण सीरतने गॅरीचा हात धरत पळून जाण्याचा मार्ग निवडला आहे.

प्रोमोमध्ये दिसणारी सर्व दृश्ये स्वप्नवत आहेत, निर्मात्यांनी अतिशय सुंदरपणे सृजनशीलतेला अस्सलतेचा स्पर्श देऊन दृश्यांची रचना केली आहे. लग्नाची थीम अस्सल वाटण्यासोबतच अतिशय आकर्षक झाली आहे. हे रील लग्न बॉलीवूड चित्रपटातील लग्नापेक्षा कमी नाही. आणि म्हणूनच 'तेरी मेरी डोरियां'च्या या वेडिंग सीक्‍वेन्सला ग्रॅंड म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आम्ही असे देखील ऐकले आहे की या लग्नाची थीम सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या बहुचर्चित लग्नापासून प्रेरित आहे. वधू-वरांच्या पोशाखापासून ते मंडपातील रंग आणि सेटच्या थीमपर्यंत सर्व काही त्यांच्याकडून प्रेरित आहे.

'तेरी मेरी डोरियां'मध्‍ये साहिबाची भूमिका साकारणारी हिमांशी पराशर तिच्या रील वेडिंगबद्दल म्हणते, “मी माझ्या करिअरमध्ये आधी देखील स्वत:ला ब्राइडल लूकमध्ये पाहिलं आहे पण हा लूक खास आहे. हे खूप खरे वाटते आणि माझ्या स्वप्नातील लग्न देखील असेच काहीसे  असेल जसे हे. यातील लूक पंजाबी वधूचा आहे. मी यापूर्वी कधीही पंजाबी वधू झाले नाहीये. जेव्हा मी नटून थटून संपुर्ण गेटअप सोबत सेटवर आले तेव्हा संपूर्ण कलाकार आणि टीम माझा लूक पाहून थक्क झाली होती, सगळेच माझ्या या लूकचे कौतुक करत होते. सेटवरची भव्यता आणि वातावरण पाहून मला खरे लग्न असल्यासारखे वाटत होते. आम्ही शूटिंग करताना खूप मजा केली. साहिबाच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट असून तिच्यासोबतच अंगदच्याही आयुष्यात बदल घडवून आणणारा आहे. त्यांच्या आयुष्यातला नवा ट्विस्ट पाहण्यासाठी मी देखील खूप उत्साहित आहे."

Web Title: Sahiba aka Himanshi Parashar opens up about the wedding sequence in 'Teri Meri Doriyan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.