'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अंजीची या मालिकेत एन्ट्री, साकारणार ठसकेबाज मनवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:42 PM2024-01-24T15:42:54+5:302024-01-24T15:43:04+5:30

Komal Kumbhar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Sahkutumb Saahparivar' series fame Anji Aka Komal Kumbhar's entry in Aboli Serial | 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अंजीची या मालिकेत एन्ट्री, साकारणार ठसकेबाज मनवा

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील अंजीची या मालिकेत एन्ट्री, साकारणार ठसकेबाज मनवा

स्टार प्रवाहच्या सहकुटुंब-सहपरिवार (Sahkutumb Sahparivar) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेचे कथानक आणि त्यातील पात्र प्रेक्षकांना खूप भावले होते. या मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेनं निरोप घेतला असला तरी यातील पात्रांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार (Komal Kumbhar) लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अबोली मालिकेत कोमलची एण्ट्री होणार असून मनवा हे पात्र ती साकारणार आहे.

अबोली मालिकेत मनवाला नाईलाजाने देहविक्रेय व्यवसायात उतरावं लागलं. याविषयी तिच्या मनात सल आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये असं तिला वाटतं. अबोलीच्या पुढाकारामुळे मनवाचा शिंदे कुटुंबात प्रवेश होणार का याची उत्सुकता आहे. मनवाचं शिंदे कुटुंबासोबत नेमकं काय नातं आहे हे देखील मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.


अबोली मालिकेतल्या मनवा पात्राविषयी सांगताना कोमल कुंभार म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अश्या प्रकारची भूमिका साकारते आहे. लूकही खूप वेगळा आहे. अंजीप्रमाणेच मनवाही ठसकेबाज आहे. अबोलीच्या कुटुंबाने माझं खूप मनापासून स्वागत केलं आहे. पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचाही आनंद आहेच. सहकुटुंब सहपरिवार मधल्या अंजीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळाले आहे. हेच प्रेम मनवा या भूमिकेलाही मिळेल याची खात्री आहे. 

Web Title: 'Sahkutumb Saahparivar' series fame Anji Aka Komal Kumbhar's entry in Aboli Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.