‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम 'या' अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; मुंबईकरांसाठी दिली खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 07:01 PM2023-04-13T19:01:33+5:302023-04-13T19:02:08+5:30

Sakshee gandhi: अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या नव्या व्यवसायाविषयी माहिती दिली आहे.

sahkutumb sahaparivar actress sakshee gandhi aka avani started hapus mango business | ‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम 'या' अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; मुंबईकरांसाठी दिली खास ऑफर

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम 'या' अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय; मुंबईकरांसाठी दिली खास ऑफर

googlenewsNext

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयक्षेत्रासह अन्य बऱ्याच क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्येच आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचा स्वत:चा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. या अभिनेत्रीने आंब्यांचा सीझन लक्षात घेता आंब्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. याविषयी तिने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील प्रत्येक कलाकार अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. ही कलाकार मंडळीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात आणि त्यांना स्वत: विषयीचे अपडेट देतात. अलिकडेच मालिकेतील अवनीने म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधीने तिचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.

अलिकडेच साक्षीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या नव्या व्यवसायाविषयी माहिती दिली आहे. साक्षीने रत्नागिरी हापूर आंब्यांच्या विक्रीचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांसाठी तिने खास ऑफरही दिली आहे.

साक्षीने तिच्या व्यवसायाचं नाव ‘सावनी मँगोज’ असं ठेवलं आहे. मालिकेत तिचं नाव आवनी आहे आणि तिचं खरं नाव साक्षी त्यामुळे या दोन्ही नावांना एक करत तिने सावनी हे नाव व्यवसायासाठी निवडलं आहे. तसंच ‘ज्यांच्या ऑर्डर्स चार डझनपेक्षा जास्त असतील, त्यांच्या घरी मी स्वतः आंबे डिलीव्हर करायला जाणार आहे,’ असं म्हणत तिने ही खास ऑफरही ग्राहकांना दिली आहे.
 

Web Title: sahkutumb sahaparivar actress sakshee gandhi aka avani started hapus mango business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.