सहकुटुंब सहपरिवार: मोरेंच्या घरात होणार अंजीचा गृहप्रवेश; अखेर पशा घेऊन येणार घरच्या लक्ष्मीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:54 IST2022-05-09T17:53:12+5:302022-05-09T17:54:10+5:30
Sahkutumb sahaparivar:सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पशा, अंजीला घरी घेऊन जाण्यास येत आहे.

सहकुटुंब सहपरिवार: मोरेंच्या घरात होणार अंजीचा गृहप्रवेश; अखेर पशा घेऊन येणार घरच्या लक्ष्मीला
छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सहकुटुंब सहपरिवार' (sahkutumb sahaparivar). या मालिकेत दाखवण्यात आलेल्या एकत्र कुटुंबपद्धती प्रेक्षकांना विशेष भावत आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. यामध्येच सध्या मोरे कुटुंबात अनेक चढउतार येत आहेत. मात्र, या परिस्थितीमध्येही संपूर्ण कुटुंब जोडून राहण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून घरापासून दूर असलेली अंजी आता घरी परतणार आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पशा, अंजीला घरी घेऊन जाण्यास येत आहे. इतंकच नाही तर वाटेत अंजीच्या पायाला ठेच लागते म्हणून तो चक्क तिला कडेवर उचलून मोरेंच्या घरी जातो. त्यामुळे अंजीचा आता पुन्हा मोरेंच्या घरात गृहप्रवेश होणार आहे.
दरम्यान, 'अंजीला पुन्हा घरी घेऊन या नाही तर तुमचं आणि माझं नातं संपलं', असं सरिता पशाला बजावून सांगते. त्यामुळे वहिनीला आईच्या जागी मानणारा पशा, अंजीला घ्यायला जातो. विशेष म्हणजे पशा, वहिनींच्या सांगण्यावरुन आलाय हेदेखील अंजीला माहित असतं. त्यामुळे कोणतेही आढेवेढे न घेता तीदेखील घरी जाण्यास तयार होते. मात्र, आता या दोघांमध्ये निर्माण अढी कमी होईल की नाही हे येत्या भागातच प्रेक्षकांना समजणार आहे.