"आई वडिलांच्या जीवाची घालमेल होत नसेल का?", 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री कुटुंबाच्या आठवणीत व्याकुळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 14:13 IST2024-01-20T14:13:28+5:302024-01-20T14:13:46+5:30
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत अवनीची भूमिका साक्षी गांधी(Sakshi Gandhi)ने साकारली होती. मालिका संपल्यानंतर साक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

"आई वडिलांच्या जीवाची घालमेल होत नसेल का?", 'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री कुटुंबाच्या आठवणीत व्याकुळ
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यातील पात्रांनी रसिकांच्या मनात घर कायम केले आहे. या मालिकेत अवनीची भूमिका विरोधी होती तरी तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. अवनीची भूमिका साक्षी गांधी(Sakshi Gandhi)ने साकारली होती. मालिका संपल्यानंतर साक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दरम्यान आता सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे.
साक्षी गांधी हिने कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, मुलं मोठी झाली की करिअर करण्यासाठी बाहेर पडतात .. आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात .. महिनोंमहिने भेट नाही , पाहणं नाही .. फक्त काय ते कॉलवर आवाज ऐकणं.. ७ वर्ष झाली चिपळूण सोडून मुंबईत आले.. घरच्यांपासून दूर.. खूप मोठ्ठ व्हायचं असतं, पैसे कमवायचे असतात, सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या असतात का ???? तर आयुष्यात सेटल व्हायचंय.. निवांत व्हायचं आहे.. पण खरंच आपण होतो का कधी पूर्णपणे सेटल…???????
ती पुढे म्हणाली की, कामासाठी इतके धावत आपण असतो की अनेक दिवस एखादा २ मिनिटांचा कॉलसुद्धा घरी होत नाही .. नसेल का होत आई वडिलांच्या जिवाची घालमेल ??? त्यांना रात्र रात्र झोप लागत असेल का ? एखादा चमचमीत पदार्थ उतरत असेल का त्यांच्या घशाखाली ??? कधीतरी त्रास होतो या विचारानी .. पण सहज उठून जाताही येत नाही … तेव्हा भासते घराची ओढ… आई पप्पा क्षितू …खूप दिवस झाले पाहिलं नाहीये तुम्हाला ….. पण भेटू लवकरच ( घरच्यांना सुद्धा भेटू लवकरच .. हे म्हणावं लागतंय).