'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' दिसणार नाटकात, साकारणार सावित्रीबाईंची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 09:44 AM2023-11-06T09:44:27+5:302023-11-06T09:44:44+5:30
Nandita Patkar : 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेतील 'सरु' म्हणजेच नंदिता पाटकर लवकरच नाटकात दिसणार आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितले आहे.
सहकुटुंब सहपरिवार मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला. सगळेच कलाकार लोकप्रिय झाले. या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन कायम आहे. या मालिकेत सरुची भूमिका अभिनेत्री नंदिता पाटकर हिने साकारली होती. दरम्यान आता तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ती लवकरच नाटकात दिसणार आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितले आहे.
नंदिता पाटकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, मराठी रंगभूमी दिना निमित्त जाहीर करायला आनंद होत आहे.......लवकरच मराठमोळ सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांवरचे नाटक 'व्हय मी सावित्रीबाई!' English मध्ये येत आहे. आता सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे नंदिता पाटकर........! नंदिताच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
नंदिता पाटकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. शेवटची ती स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत पाहायला मिळाली होती. या मालिकेत तिने सरुची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेशिवाय तिने आणखी काही मालिकेत काम केले आहे. तर डॉ. काशीनाथ घाणेकर, रंगा पतंगा, लालबागची राणी आणि एलिझाबेथ एकादशी यासारख्या चित्रपटात ती झळकली आहे.