'अरे! ही तर माझी बहीण...' सईला पाहून श्रद्धा कपूरची प्रतिक्रिया; फॉरेन भाषेत रंगली जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 11:43 IST2024-12-21T11:42:51+5:302024-12-21T11:43:35+5:30

अभिनेत्री किशोरी गोडबोलेंची लेक सई श्रद्धा कपूरला भेटली, श्रद्धासारखंच सईकडेही आहे फॉरेन लँग्वेजमध्ये बोलण्याचं टॅलेंट

sai godble daughter of marathi actress kishori godbole met shraddha kapoor both talked in foreign language | 'अरे! ही तर माझी बहीण...' सईला पाहून श्रद्धा कपूरची प्रतिक्रिया; फॉरेन भाषेत रंगली जुगलबंदी

'अरे! ही तर माझी बहीण...' सईला पाहून श्रद्धा कपूरची प्रतिक्रिया; फॉरेन भाषेत रंगली जुगलबंदी

'अधुरी एक कहाणी' फेम मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले यांची लेक सई गोडबोले (Sai Godbole) मल्टिटॅलेंटेड आहे. ती उत्तम गाते आणि नृत्यही करते. मात्र या व्यतिरिक्त सईकडे एक वेगळं टॅलेंट आहे. ते म्हणजे ती अनेक भाषा जशास तशा उच्चारात आणि टोनमध्ये बोलते. फ्रेंच, ब्रिटीश इंग्लीश, अमेरिकन इंग्लिश, रशियन अशा सगळ्या फॉरेन भाषा ती अगदी चोख बोलते. हेच टॅलेंट बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे (Shraddha Kapoor) सुद्धा आहे. दरम्यान याच दोघींची एका इव्हेंटमध्ये भेट झाली  तेव्हा काय धमाल आली याचा व्हिडिओ स्वत: सईने शेअर केला आहे.

सई गोडबोले नुकतीच एका इव्हेंटमध्ये श्रद्धा कपूरला भेटली. यावेळी सई तिच्यासमोर फ्रेंच, अमेरिकन इंग्रजीच्या टोनमध्ये बोलत होती. हे पाहून श्रद्धाही शॉक झाली. तिनेही सईला तशाच भाषेत उत्तर दिलं. दोघींची मस्त जुगलबंदी रंगली. यावेळी श्रद्धा म्हणाली, 'अरे मला असं वाटतंय मी माझ्या बहिणीलाच भेटतीये. कुठे होतीस तू आतापर्यंत?' 


सईच्या या व्हिडिओवर स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर,  यशराज मुखाटे यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. दोघींचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. सईला काही दिवसांपूर्वीच लॉस एंजेलिस येथे अॅपलच्या इव्हेंटचं आमंत्रण मिळालं होतं. ती आता अॅपल फॅमिलीचाच भाग झाली आहे. किशोरी गोडबोलेंनाही लेकीचा खूप अभिमान वाटतो. 

Web Title: sai godble daughter of marathi actress kishori godbole met shraddha kapoor both talked in foreign language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.