"MHJ ची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे...", सई ताम्हणकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 15:49 IST2024-02-28T15:47:44+5:302024-02-28T15:49:36+5:30
सई सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'पासून दूर आहे. पण, ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या आठवणीत भावुक झाली आहे.

"MHJ ची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे...", सई ताम्हणकरची पोस्ट चर्चेत
मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. बोल्ड आणि बिनधास्त असलेल्या सईचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. सई सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय शोच्या परिक्षकाच्या खुर्चीत बसून सई स्किटबद्दल तिचं मत मांडते. पण, सध्या सई हास्यजत्रेत दिसत नाही. हास्यजत्रेपासून दूर असलेल्या सईने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
सईने सध्या वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यामुळे ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'पासून सध्या दूर आहे. पण, सई 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या आठवणीत भावुक झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवरुन हास्यजत्रेच्या खुर्चीत बसलेला एक फोटो शेअर केला आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्राची सगळ्यात चांगली गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? या खुर्चीत बसूनही मी माझी असते. याचं शूटिंग मी मिस करतेय. कारण, मी वेब शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे," असं कॅप्शन सईने दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. प्रियदर्शनी इंदलकरने कमेंट करत "मिस यू टू" असं म्हटलं आहे.
सईने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या भक्षक सिनेमात ती झळकली होती. या सिनेमात तिने भूमी पेडणेकरसह स्क्रीन शेअर केली आहे. याआधी सई 'हंटर' आणि 'मिमी' या बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. लवकरच ती नव्या कोऱ्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.