सायली संजीव आणि संग्राम साळवी गुलमोहर या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 10:27 AM2018-03-01T10:27:47+5:302018-03-01T15:57:47+5:30

झी युवावर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी गुलमोहर ही मालिका लोकप्रिय होत आहे. एका गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण ...

Sally Sanjeev and Sangram Salvi Gulmohar in this series | सायली संजीव आणि संग्राम साळवी गुलमोहर या मालिकेत

सायली संजीव आणि संग्राम साळवी गुलमोहर या मालिकेत

googlenewsNext
युवावर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी गुलमोहर ही मालिका लोकप्रिय होत आहे. एका गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण करून वेगवेगळ्या हृदयस्पर्शी कथा सांगणारी गुलमोहर ही मालिका सध्या सगळ्यांचीच आवडती झाली आहे. ५ आणि ६ मार्चला संध्याकाळी ९:३० वाजता गुलमोहर या मालिकेत सर्वांची आवडती अभिनेत्री सायली संजीव आणि आणि अतिशय डॅशिंग असा अभिनेता संग्राम साळवी हे दोघे त्यांची प्रेमकथा घेऊन येत आहेत. मराठी आणि गुजराती खाद्य संस्कृतीची ओळख आणि त्यावर सुरू असणारा कुटुंबाचा धंदा आणि त्यातून घडणारे प्रेम या कथेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
युवराज यांचे वडील वर्षानुवर्षं महाराष्ट्र खाद्यसंस्कृतीची ओळख असलेला वडापावचा धंदा करत असतात, तर या धंद्याला चॅलेंज देण्यासाठी गुजरातची खांडवी घेऊन सेजल येते आणि त्यानंतर सुरू होते एकमेकांचा धंदा बंद करण्याची चढाओढ. एकमेकांचा धंदा बंद करण्यासाठी सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक मजेशीर घटना घडतात. दोन भिन्न संस्कृतीचे खाद्य पदार्थ, बनवण्याची प्रक्रिया, लोकांच्या आवडीनिवडी यामुळे ही कथा रुचकर ठरते. हे सर्व सुरू असताना एका क्षणाला त्या दोघांच्या लक्षात येते की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. आता धंदा की प्रेम या द्विधा अवस्थेत अडकलेल्या या दोघांची कथा म्हणजे वडापाव वेड्स खांडवी!!
काहे दिया परदेस या मालिकेमुळे नावारूपाला आलेली सायली संजीव सांगते, "मराठी नंतर बिहारी आणि आता गुजराता या तिन्ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. मुंबई सारख्या शहरात सगळ्याच संस्कृतीचे लोक एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहतात. माझ्या कॉलनी मध्ये अनेक गुजराती कुटुंब असल्यामुळे मला शब्दांची चांगली ओळख होती. त्यामुळे ही भूमिका करणे मला अतिशय सोपे गेले. ही माझी दुसरीच मालिका असल्यामुळे गुलमोहर माझे विशेष प्रेमाचे आहे. या नवीन फॉरमॅट मध्ये मंदार देवस्थळी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय सुंदर होता.

Also Read : काहे दिया परदेस फेम सायली संजीवचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का?

Web Title: Sally Sanjeev and Sangram Salvi Gulmohar in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.