'केसांना धरुन फरफटत घरातून बाहेर काढेन'; भाईजानची अभिजीत बिचुकलेला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 05:13 PM2022-01-11T17:13:02+5:302022-01-11T17:13:59+5:30
Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकले त्यांच्या असभ्य वर्तन, आणि चुकीचे शब्दप्रयोग केल्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच विकेंडचा वॉरमध्ये सलमान खानने (Salman Khan) अभिजीतची कानउघडणी केली आहे.
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून 'बिग बॉस' (bigg boss 15) या रिअॅलिटी शो कडे पाहिलं जातं. परंतु, यंदाचं १५ वं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीत उतरण्यास अपयशी ठरलं. त्यामुळेच या शोच्या मेकर्सने या पर्वात अनेक नवनवीन बदल केले. यातच हे पर्व चालण्यासाठी अभिजीत बिचुकले(Abhijit Bichukale) , देवोलीना भट्टाचार्जी आणि रेश्मी देसाई यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री. या तिघांची घरात एन्ट्री झाल्यापासून घरातील वादविवाद चांगलेच वाढले आहेत. इतकंच नाही तर अभिजीत बिचुकले त्यांच्या असभ्य वर्तन, आणि चुकीचे शब्दप्रयोग केल्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच विकेंडचा वॉरमध्ये सलमान खानने (Salman Khan) अभिजीतची कानउघडणी केली आहे. इतकंच नाही तर, तुझ्या केसांना धरुन घरातून बाहेर हकलेन अशी धमकीही दिली आहे.
सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस १५'चा एक लेटेस्ट प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान अभिजीतवर प्रचंड संतापल्याचं दिसून येत आहे. यात सलमानने अभिजीतची कानउघडणी केली. विशेष म्हणजे सगळ्यांसमोर अपमान झाल्यानंतर बिचुकले सुद्धा संतापला आणि त्याने सलमानला प्रत्युत्तर दिलं.
'लग्नानंतर एका आठवड्यातच ते आईला सोडून गेले'; Bigg boss फेम अभिनेत्रीने सांगितली फॅमिली स्टोरी
"बिचुकले, तुम्ही घरात ज्या घाणेरड्या शिव्या देतात. जर त्याच शिव्या तुमच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीला दिल्या तर कसं वाटेल? शेवटचं सांगतोय, जर पुन्हा असं झालं तर घरात येऊन तुला मारेन. इतकंच नाही तुझ्या केसांना पकडून घरातून फरफटत तुला बाहेर काढेन लक्षात ठेव", असं सलमान म्हणाला.
दरम्यान, सलमानचे हे वाक्य ऐकल्यावर अभिजीत प्रचंड संतापतो आणि मला या शोमध्ये रहायचंच नाहीये. खड्ड्यात गेला तुमचा शो असं म्हणत विकेंडचा वॉर मध्येच सोडून निघून जातो. आता यापुढे या घरात कोणता नवा वाद रंगतोय. सलमान-अभिजीतचा वाद कुठंपर्यंत जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.