Bigg Boss 14: सच्चा गेम खेलो...! टीआरपी घोटाळ्यावर सलमान खानने काढला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:12 PM2020-10-12T14:12:58+5:302020-10-12T14:14:08+5:30
होय, ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने टीआरपी घोटाळ्याच्या निमित्ताने काही चॅनल्सवर निशाणा साधला.
मुंबई पोलिसांनी अलीकडे वृत्त व मनोरंजन वाहिन्यांचा टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट) घोटाळा उघडकीस आणला आणि अनेकांचे धाबे दणाणले. या टीआरपी घोटाळ्याचा पडसाद बिग बॉस 14 या शोमध्येही उमटले. होय, ‘वीकेंड का वार’मध्ये सलमानने टीआरपी घोटाळ्याच्या निमित्ताने काही चॅनल्सवर निशाणा साधला. अर्थात त्याने कोणाच्या नावाचा थेट उल्लेख केला नाही. पण त्याच्या इशारा कोणाकडे होता, हे समजायला फार वेळ लागला नाही.
सुशांत सिंग प्रकरणात काही मीडिया हाऊसेसने सलमानला लक्ष्य केले होते. प्राइम टाईम शोदरम्यान न्यूज चॅनल्सवर सलमानला सवाल केले जात होते. त्यावेळी सलमानने उत्तर देणे टाळले. मात्र योग्य वेळ येताच टीआरपी घोटाळ्याच्या निमित्ताने त्याने प्रत्युत्तर दिले. ‘वीकेंड का वार’मध्ये बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना त्याने ‘टीआरपी’ डोस दिलेत. केवळ टीआरपीसाठी काहीही करू नका. योग्य खेळ खेळा. विनाकारण आरडाओरड केली तर लोक टीव्ही बंद करतात किंवा मग पुढे जातात. मला जे बोलायचे ते मी बोललो, आता बाकी तुम्ही समजा, असे सलमान यावेळी म्हणाला.
‘बिग बॉसच्या घरात किंवा अन्य कोणत्याही शोमध्ये तुम्हाला तुमचा योग्य खेळ खेळावा लागतो. टीआरपीसाठी काहीही केले, असे होत नाही. यार, हा बकवास करतोय, ओरडत आहे, खोटे बोलतोय, असे प्रेक्षक म्हणणार नाहीत तर थेट तुमचे चॅनल बंद करतशील. मला जे बोलायचे ते मी अप्रत्यक्षपणे बोललो आहे. प्रामाणिक राहा, खरा खेळ खेळा,’ असे सलमान यावेळी म्हणाला.
Bigg Boss 14: अब शादी का कोई चान्स नहीं...! सलमान खानच्या लग्नाबद्दल ज्योतिषाची भविष्यवाणी
'बिग बॉस' शो सोडण्याच्या तयारीत होता सलमान खान, कारण वाचून व्हाल हैराण
मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला होता. यादरम्यान एका साक्षीदाराने एनडीटीव्हीशी बोलताना काही ठराविक चॅनेल पाहण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत होते असा खुलासा केला होता. या व्यक्तीच्या घरात टीआरपी मोजण्यासाठी मीटर बसवण्यात आले होते. तीन साक्षादारांपैकी एक असणा-या या व्यक्तीने आपल्या घरात मीटर लावण्यात आल्यानंतर बिलाची काळजी घेतली जाईल, याशिवाय डीटीएचचा रिचार्जही केला जाईल असे सांगण्यात आल्याचा खुलासा केला होता.