दुखापतीमुळे त्रस्त असूनही सलमानने शूट केला Bigg Boss 18 चा प्रोमो, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 11:43 AM2024-09-06T11:43:51+5:302024-09-06T11:44:17+5:30

शूटनंतर तो बाहेर आला तेव्हा पापाराझींसमोर त्याने पोज दिली. यावेळी त्याला त्रास होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

Salman Khan shot Bigg Boss 18 promo despite bad injury video viral | दुखापतीमुळे त्रस्त असूनही सलमानने शूट केला Bigg Boss 18 चा प्रोमो, Video व्हायरल

दुखापतीमुळे त्रस्त असूनही सलमानने शूट केला Bigg Boss 18 चा प्रोमो, Video व्हायरल

सलमान खान (Salman Khan) देशातला सर्वात हँडसम आणि लोकप्रिय सुपरस्टार. वयाच्या ५८ व्या वर्षीही त्याच्यावर चाहते फिदा आहेत. सध्या सलमान  बरगड्यांच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो ज्या ज्या ठिकाणी जातोय तिथे कॅमेऱ्यासमोर त्याला त्रास होत असल्याचं स्पष्ट जाणवत आहे. अशा परिस्थितीतही नुकतंच सलमानने बिग बॉस 18 (Bigg Boss 18) चा प्रोमो शूट केला आहे. याचा अर्थ सलमानच बिग बॉस होस्ट करणार असून कितीही दुखापत असली तरी त्याने चाहत्यांना नाराज करणं टाळलं आहे.

कालच सलमानने 'बिग बॉस १८' चा प्रोमो शूट केला. शूटनंतर तो बाहेर आला तेव्हा पापाराझींसमोर त्याने पोज दिली. शर्ट, पँट आणि ब्लॅक ब्लेझर या लूकमध्ये तो नेहमीप्रमाणे हँडसम दिसत होता. तरी मध्ये मध्ये तो दुखापतीमुळे त्रस्तही दिसत होता. सतत कंबरेच्या वर हात लावताना दिसला. काही दिवसांपूर्वी सलमान एखा इव्हेंटमध्ये आला असता तिथे त्याला सोफ्यावर उठणंही कठीण झालं होतं. तरी तो वर्क कमिटमेंट्स पूर्ण करत आहे. सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


यानंतर सलमान एका गरीब महिलेशीही दिलखुलास संवाद साधताना दिसला. ती त्याच्याशी छान बोलत होती आणि सलमानही तिचं अगदी पेशन्सने ऐकत होता. सलमानच्या प्रेमळ स्वभावाचं चाहते कौतुक करत आहेत.


सलमान या दुखापतीतही आगामी 'सिकंदर' सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्याचं वजनही खूप वाढलेलं दिसत आहे. दरम्यान बिग बॉस 18 ची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. याचा प्रोमो आणि शो कधीपासून सुरु होणार याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. 

Web Title: Salman Khan shot Bigg Boss 18 promo despite bad injury video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.