Bigg Boss 14 : सलमान खानने पुन्हा नाव न घेता अर्णब गोस्वामीला काढला 'चिमटा', हसू लागले घरातील लोक
By अमित इंगोले | Published: October 19, 2020 09:36 AM2020-10-19T09:36:19+5:302020-10-19T09:37:43+5:30
सलमान खानने पुन्हा एकदा न्यूज चॅनल रिपब्लिकचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना 'चिमटा' काढला. त्यानंतर घरात एकच हशा पिकला.
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसच्या १४ सीझन सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. घरात फ्रेशर्स आणि सीनिअर्समध्ये जोरदार वाद पेटलाय, सोबतच मजा-मस्तीही सुरू आहे. वीकेंडला सलमान खान शोमध्ये आल्याने आनंदाचं वातावरण होतं. घरात जर तणावाचं वातावरण असेल तर तो असं काही बोलतो की, सर्वांचा मूड ताजतणावा होऊन जातो. सलमान खानने पुन्हा एकदा न्यूज चॅनल रिपब्लिकचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना 'चिमटा' काढला. त्यानंतर घरात एकच हशा पिकला.
बिग बॉसमध्ये रविवारी म्हणजे वीकेंडला सलमान खान जान कुमार सानूसोबत बोलताना म्हणाला होता की, तो कुणाच्यातरी इशाऱ्यावर नाचत आहे. तो पुढे म्हणाला की, जान घरात कुणाचंच ऐकत नाही आणि कधी कधी तर तो स्वत:चंही ऐकत नाही. जर तसं बघितलं तर तिन्ही सीनिअर्सनंतर जान हाच डोक्याने सीनिअर आहे. त्यानंतर सलमानने जानला समजावत सांगितलं की, 'मी नाही म्हणत की, This want to know, That want to know, सोपं आहे मला हे जाणून घ्यायचंय की तू कोणत्या मार्गावर चालत आहे'. अर्णब गोस्वामी त्यांच्या शोमध्ये नेशन वॉन्ट्स टू नो असं म्हणतात नेहमी ऐकायला मिळतात. (Bigg Boss: बिग बॉसच्या घरात तग धरून राहणं आहे कठीण, हे ९ स्पर्धक झालेत जखमी)
टीआरपी स्कॅमवरून मारला होता टोमणा
दरम्यान गेल्या आठवड्यात सलमान खानने अर्णब गोस्वामीला टोमणा मारला होता. सलमान खानने बिग बॉसच्या घरातील लोकांना सांगितले होते की, त्यांनी आपला खेळ चांगल्या प्रकारे पुढे खेळावा. त्यासोबतच त्याने घरातील लोकांना समजावले होते की, केवळ टीआरपी मिळवण्यासाठी काहीही करू नका नाही तर चॅनल बंद होईल. यावर अर्णब गोस्वामीची प्रतिक्रिया आली होती आणि त्याने सलमान खानवर निशाणा साधला होता. (Bigg Boss 14: डबल डेटिंगची पवित्रा पुनियाने स्वत:च दिली कबुली, पारस छाब्रासोबत होती रिलेशनशीपमध्ये)
रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी स्कॅमचा आरोप
दरम्यान रिपब्लिक टीव्हीवर टीआरपीमध्ये हेरफेर करण्याचा आरोप लागला होता. टीआरपी स्कॅमच्या खूलाशात पोलिसांनी सांगितले होते की, सुशांत सिंह राजपूत केसच्या कव्हरेज दरम्यान काही चॅनल्सनी कशाप्रकारे फेक टीआरपी मिळवला होता. टीआरपी स्कॅम समोर आल्यावर या चॅनल्सना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात आलं होतं. लोकांना आपला मीडियावर आपला संताप व्यक्त केला होता.