सलमान खानने उलगडले त्याच्या आयुष्यातील 'हे' गुपित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 13:17 IST2018-08-20T12:54:53+5:302018-08-20T13:17:07+5:30
त्यांची बालपणातील अस्थायी शाळा म्हणजे गाई-म्हशी रानात चरायला गेल्या की मित्रांसोबत मिळून गोठ्यातील जमीन साफ करून तिथेच त्या गोठ्यात भरत असे.

सलमान खानने उलगडले त्याच्या आयुष्यातील 'हे' गुपित
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनचा दस का दम कायम मनोरंजन करत आला आहे आणि सलमान खानने या शोचे सूत्रसंचालन करतो आहे. प्रत्येक शनिवार व रविवार आधीपेक्षा अधिक दमदार बनत आहेत. आगामी दमदार व्हिकएंडच्या एपिसोडमध्ये, सलमान खान आपल्या फ्लर्टिंग इतिहासावर प्रकाश टाकणार आहे आणि शो च्या होस्टचे आणि शोच्या चाहत्यांना आयुष्यभर आश्चर्यचकित करणार आहे! जेव्हा प्रश्न विचारला, आपल्या शाळेच्या शिक्षकांबरोबर कित्येक भारतीय पहिल्यांदाच प्रेमात पडले? तेव्हा या शोचा होस्ट सलमानने आपल्या मनातील एका गुपितच खुलासा केला होता की, तो शाळेत असताना शिक्षकासोबत इश्कबाजी करायचा! आता आम्हाला माहिती आहे की बी-टाउन मधील सर्वात पात्र बॅचलर आहे आणि खूप सुंदर आणि आघाडीच्या अभिनेत्रींशी त्याची ओन आणि ऑफ स्क्रीन मैत्री आहे ते, पण आजच्या त्याच्या ह्या किस्स्यामुळे तर अजून दोन पाहुणे, बादशाह आणि रवीना टंडन ह्यांच्यासह प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसला आहे.
हे गुपित उलगडताना सलमानने आपल्या शिक्षकांबरोबर प्रेम करावयाच्या वेगवेगळ्या संधी कशा शोधल्या ते संगितले. त्यांनी कबूल केले की तो शाळेतील शिक्षकाला सायकलवरून खाली पडायचा आणि सायकलीचा कॅरियर काढून टाकयाचा. ज्यामुळे त्याला त्याच्या शिक्षकांना सायकल वर पुढे बसवून, त्यांच्या अधिक जवळ जाता येईल. ह्या वर अधिक मोकळे पणे बोलताना सलमान खान म्हणाले, ''आपल्या शिक्षकंच्या प्रेमात न पडणे केवळ अशक्य आहे.'' बहुतेक लोक ते मान्य करणार नाहीत, परंतु मी उघडपणे असे म्हणते की मी माझ्या शिक्षकाबरोबर खूप मस्ती आणि प्रेम केले आहे.