4 जूनपासून सलमान खानचा 'दस का दम' प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 10:07 AM2018-05-30T10:07:54+5:302018-05-30T15:37:54+5:30

चित्रपट सृष्टीतील सर्वात आवडता अभिनेता, सलमान खान सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर त्याच्या अनोख्या शैलीत देश दस का दम वर खिळवून ...

Salman Khan's 'Dus Ka Dham' audience meeting from June 4 | 4 जूनपासून सलमान खानचा 'दस का दम' प्रेक्षकांच्या भेटीला

4 जूनपासून सलमान खानचा 'दस का दम' प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext
त्रपट सृष्टीतील सर्वात आवडता अभिनेता, सलमान खान सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर त्याच्या अनोख्या शैलीत देश दस का दम वर खिळवून ठेवले होते. या शोच्या माध्यमातून सलमानने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली होती. हा कार्यक्रम तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे. 

लॉचिंग पूर्वी का दमने सोनालिव्ह अॅपवर सर्वेक्षण केले यात 15 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या लोकांना ऑडिशनची संधी मिळाली आहे.  पहिल्या फेरीत दोन स्पर्धक सहभागी होणार आहेत. 5 का पंच जो नॉकआउट राउंड असेल. जो खेळाडू किमान 5 प्रश्नांची योग्य उत्तरे देणार आहे, ते पुढच्या फेरीमध्ये जातील आणि इतर प्रतिस्पर्ध्याला बाहेर काढले जाईल. या फेरीतील प्रत्येक प्रश्न 20 हजारांचा असेल आणि स्पर्धकांना स्क्रीनवर अंदाजे टक्केवारी लॉक करण्यासाठी 15 सेकदांचा वेळ दिला जाईल. या फेरीत स्पर्धक  उत्तर देण्यासाठी आपल्या कुटुंबांशी संपर्कदेखील साधू शकतील. बाद झालेले स्पर्धक रिकाम्या हाताने जाणार नाहीत! दुस-या फेरीला 10 गुना दम असे म्हटले जाते ज्यात सहभाग घेणा-या स्पर्धकांना, चार गुना, छह गुना, आठ गुना अथवा दस गुना या भागांमधून मिळणारे उत्पन्न वाढण्याची संधी मिळते.  

सोनी एलआयव्ही अॅपद्वारे, दर्शकांसह प्रतिबद्धता तीन टप्प्यांत होईल. शोच्या शुभारंभानंतर ऑडिशन आणि 'प्ले अलोंग' या संवर्धनासाठी सर्वे करण्यात आले. जागतिक टेलिव्हिजनच्या इतिहासातील हे पहिले यश आहे. ज्याद्वारे दर्शकांच्या अंतर्दृष्टीमुळे शोमधील संभाव्य प्रश्नांच्या रूपात पाठींबा निर्माण होईल. तसेच शो ऑन-एअर झाल्यावर वापरकर्त्यांना सोनालीव्ही अॅप्सवर प्ले अलोंगसह बक्षिसे देखील मिळत राहील. बिग सिनर्जी निर्मित, दस का दम या नव्या मोसमात सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजन (एसईटी) आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजन, यूके यांच्या घरच्या सर्जनशील संघाने पुन्हा डिझाइन आणि विकसित केलेल्या सर्व नव्या स्वरूपाचे दावे केले आहेत. 

Web Title: Salman Khan's 'Dus Ka Dham' audience meeting from June 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.