शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 11:32 AM2018-09-04T11:32:06+5:302018-09-04T11:33:11+5:30

सलमान आणि शाहरुख खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याविषयची अनेक गुपिते दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली.

Salman Khan's father Salim khan had gave support to Shahrukh khan at the time of his struggle | शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो

शाहरुख खानने सांगितले, स्ट्रग्लच्या दिवसात सलमान खानच्या घरी जेवायचो

googlenewsNext

सलमान खानचा दस का दम हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. पण या सिझनला म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने या कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा दमदार असणार आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना पाहायला मिळणार आहे. ते दोघे मिळून या कार्यक्रमात खूप मजा मस्ती करणार आहेत.

शाहरुख खान, सलमान खान आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला कुछ कुछ होता है हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या वेळेच्या अनेक आठवणी या तिघांनी दस का दम या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थितांना सांगितल्या. दस का दम या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.

सलमान खानने या भागात 'जिने के हैं चार दीन' या चित्रपटावर नृत्य सादर केले. त्यावेळी त्याची या गाण्यातील सिग्निचर स्टेप देखील सगळ्यांना पाहायला मिळाली. सलमान आणि शाहरुखने त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकाच काळात सुरू केली आहे. ते खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यांनी आपल्या खाजगी आयुष्याविषयची देखील अनेक गुपिते या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगितली. शाहरुखने त्याच्या स्ट्रग्लिंग डेजच्या आठवणींना उजाळा दिला. शाहरुख खानने सांगितले, "मी मुंबईत आलो, त्यावेळी मला बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला होता. मी सलमान खानच्या घरी जेवायचो, जिथे सलीम खान यांनी मला भरपूर मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी 'शाहरुख खान'’ बनलो आहे. मी सलमान खान मुळेच या शोमध्ये आलो आहे. मला सलमान जिथे जायला सांगेल तिथे मी जाईन. मला या शोमध्ये बोलवल्याबद्दल मी सोनी टीव्हीचा आभारी आहे. कारण आमच्या दोघांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे आम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही, वेळ देऊ शकत नाही. सलमान खानची चांगली गोष्ट म्हणजे, तो या कार्यक्रमात येणाऱ्या त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत खूप मजा मस्ती करतो. माझ्यासाठी देखील हा अनुभव खूपच छान होता. 
 

Web Title: Salman Khan's father Salim khan had gave support to Shahrukh khan at the time of his struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.