OMG! Bigg Boss13 च्या विजेत्याला यावेळी मिळणार इतकी प्राइज मनी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 16:02 IST2019-08-11T15:59:41+5:302019-08-11T16:02:00+5:30
‘बिग बॉस 13’ची तयारी सुरू झालीय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या असताना आता एक मोठी बातमी आहे. होय, सलमान खान होस्ट करत असलेला हा शो अधिकाधिक भव्य करण्याची तयारी सुरु झाली आहे.

OMG! Bigg Boss13 च्या विजेत्याला यावेळी मिळणार इतकी प्राइज मनी!!
‘बिग बॉस 13’ची तयारी सुरू झालीय. या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्या असताना आता एक मोठी बातमी आहे. होय, सलमान खान होस्ट करत असलेला हा शो अधिकाधिक भव्य करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे, यावेळी ‘बिग बॉस 13’ची प्राइज मनी 50 लाखांवरून वाढून थेट 1 कोटी झाली आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, या सीझनमध्ये दिग्गज सेलिब्रिटी यावेत, हा यामागचा उद्देश आहे. केवळ 50 लाखांच्या प्राइज मनी साठी अनेक मोठे सेलिब्रिटी या शोमध्ये येण्यास उत्सूक नसत. त्यामुळे मेकर्सनी ‘बिग बॉस 13’ची प्राइज मनी वाढवून 1 कोटी रूपये केल्याचे कळतेय.
याशिवाय या बक्षिसाच्या रकमेबद्दल आणखी एक माहिती आहे. बक्षिसाच्या या रकमेतील अधिकाधिक रक्कम कमी व्हावी, या उद्देशाने प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांना एक टास्क खेळवला जाई. यंदाच्या सीझनमध्ये असा कुठलाही टास्क नसेल, असे कळतेय.
तूर्तास हा शो होस्ट करण्यासाठी सलमानने घेतलेल्या मानधनाचीही जोरात चर्चा आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा शो होस्ट करण्यासाठी सलमान सुमारे 400 कोटी रुपए घेणार आहे. सलमान या टीव्ही शोला चौथ्या सीझनपासून होस्ट करतोय. या शोच्या एका वीकेंडसाठी म्हणजे शनिवार-रविवारच्या दोन एपिसोडसाठी सलमान 31 कोटी रुपए मानधन घेणार आहे. शोमध्ये 13 वीकेंड असणार. या हिशेबाने ही रक्कम 403 कोटींच्या घरात जाते. अद्याप या वृत्तालाकुठलाही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
अलीकडे ‘बिग बॉस 13’मधील संभाव्य स्पर्धकांची एक यादी समोर आली. त्यानुसार, यंदाच्या सीझनमध्ये चंकी पांडे, देबोलिना भट्टाचार्य, रामपाल यादव, माहिका शर्मा, मुग्धा गोडसे असे सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात जाणार आहेत.