समता नगर आहे इरफान खानची मोठी चाहती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 09:39 AM2018-02-20T09:39:28+5:302018-02-20T15:09:28+5:30

आतापर्यंत केवळ काही स्टॅण्ड-अप विनोदवीरांच्या विनोदांपुरते मर्यादित राहिलेले राजकीय विडंबन आता ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ ...

Samata Nagar is Irfan Khan's big wish! | समता नगर आहे इरफान खानची मोठी चाहती!

समता नगर आहे इरफान खानची मोठी चाहती!

googlenewsNext
ापर्यंत केवळ काही स्टॅण्ड-अप विनोदवीरांच्या विनोदांपुरते मर्यादित राहिलेले राजकीय विडंबन आता ‘स्टार प्लस’वरील ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेचा विषय बनल्याने प्रेक्षकांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे.अश्विनी धीर दिग्दर्शित-लिखित या मालिकेत नामवंत स्टॅण्ड-अप विनोदवीर राजीव निगम हे चैतू लाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या प्रमुख भूमिकेत आहेत.या मालिकेद्वारे प्रेक्षकांना प्रथमच सद्य राजकीय स्थितीवर उपहासात्मक भाष्य केलेले पाहायला मिळेल.या मालिकेत चैतूलालची पत्नीची भूमिका रंगविणारी नामवंत अभिनेत्री समता सागर यांनी आजवर अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.सुभाष घई यांच्या ‘परदेस’ चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले होते.समता सागर म्हणाल्या,“मी इरफान खानच्या कामाची चाहती आहे.‘हिंदी मीडियम’ हा माझा अतिशय आवडता चित्रपट असून इरफान खान ज्या प्रकारच्या भूमिका रंगवितो, त्या मला खूप आवडतात.त्याच्या भूमिका केवळ अर्थपूर्ण असतात असं नाही, तर त्या मुख्य असतात.‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या आगामी मालिकेतील भूमिका मला देऊ करण्यात आली, तेव्हा मला खूप आनंद झाला कारण या मालिकेतून आपण देशातील राजकीय स्थितीवर उपहासात्मक भाष्य करण्याची संधी मिळणार होती.”‘हर शाख पे उल्लू बैठा है’ मालिकेत चैतूलाल या भ्रष्ट राजकीय नेत्याच्या कुटिल आणि संधीसाधू राजकारणावर चुरचुरीत भाष्य करण्यात आले आहे.राजकीय नेते सत्तेसाठी कसे हपापलेले असतात आणि ती प्राप्त करण्यासाठी सामान्य माणसाला कशी खोटी,पोकळ आश्वासने देतात, त्याचे चित्रण या मालिकेत विनोदी पध्दतीने केले आहे.

आजवर अनेक राजकीय विडंबन लेखन केलेले विनोदवीर राजीव निगम हे ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पुनरागमन करीत आहेत.या मालिकेबद्दल उत्सुक झालेले निगम म्हणाले, “विविध रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये मी बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या, त्याला आता बरीच वर्षं होतील. प्रेक्षक मला विचारीत की इतर विनोदवीरांप्रमाणे मी माझी स्वत:ची विनोदी मालिका कधी सुरू करणार म्हणून. या विनोदवीरांनी नॉन-फिक्शन क्षेत्रात आपल्या मालिका तयार केल्या असल्याने मी काल्पनिक क्षेत्रात मालिका निर्माण करण्याचा निर्णय घेतला. आता मी माझी स्वत:ची मालिका घेऊन टीव्हीवर येत आहे, हे सांगण्याचा माझा प्रयत्न असून प्रेक्षक माझ्या मालिकेवर प्रेम करतील, अशी आशा आहे.” राजकीय विडंबनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राजीव निगम हे या मालिकेद्वारे प्रेक्षकांची प्रशंसा मिळविण्यास उत्सुक झाले आहेत. ही नर्म विनोदी मालिका त्यांना नक्कीच गुदगुल्या करील यात शंका नाही.

Web Title: Samata Nagar is Irfan Khan's big wish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.