समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:49 IST2025-02-04T16:46:16+5:302025-02-04T16:49:44+5:30
सध्या सोशल मीडियावर या एपिसोडची प्रचंड चर्चा रंगली आहे.

समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल!
Samay Raina: 'कौन बनेगा करोडपती १६'ची (KBC 16) सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे वयाच्या ८२व्या वर्षीदेखील तितक्याच उत्साहानं काम करताना दिसतात. KBC १६ मध्ये प्रमोशननिमित्ताने अनेक कलाकार सहभागी होत असतात. नुकतंच समय रैना, भूवन बम, तन्मय भट्ट हे युट्युबर आले होते. त्यावेळेस समय रैनानं बिग बींसोबत गप्पा मारल्या तर काही किस्से शेअर केले. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, यात एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण, या व्हिडीओमागील सत्य काही तरी वेगळंंच आहे.
सध्या सोशल मीडियावर या एपिसोडची प्रचंड चर्चा रंगली आहे. एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात 'केबीसी १६' च्या हॉट सीटवर बसलेला समय रैना (Samay Raina) थेट अमिताभ यांच्यासमोर रेखाबद्दल बोलताना दिसतोय. व्हिडीओमध्ये दिसतंय की समय हा अमिताभ यांना एक विनोद सांगू का? असा प्रश्न करतो. अमिताभ यांनी होकार दिल्यास समय त्यांना विचारतो "तुमच्यात आणि वर्तुळात काय साम्य आहे?" यावर अमिताभ त्याला म्हणतात "काय आहे?". तर समय थेट म्हणतो "दोघांकडेही रेखा नाही". यानंतर सर्वंच जण हसायला लागतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हा अगदी खरा वाटले. पण, हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचं म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ एडिटिंग करून तयार करण्यात आल्याचे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. या व्हिडिओची सत्यता जाणून अनेकांना धक्का बसला आहे.
समे रैना हा एक स्टँड-अप कॉमेडियन आणि YouTuber आहे. त्याल बुद्धिबळाचीदेखील आहे.. समयच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांनी खूप पसंती आहे, ज्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपुर्वी तो 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमुळे चर्चेत आला होता. यामध्ये त्यानं दीपिकाच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर विनोद केला होता. ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता. तर त्याआधी अभिनेत्री कुशा कपिलावरही घटस्फोटावरुन वैयक्तिक जोक केला होता. यानंतर कुशा स्वत: भडकली होती. तसंच नेटकऱ्यांनीही त्याला झापलं होतं.