मी हिंदू आहे आणि राहणार! सना खानच्या 'बुरखा घाल' टिप्पणीवर संभावना सेठचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:23 IST2025-03-06T13:23:00+5:302025-03-06T13:23:59+5:30
सना खानला ट्रोल करु नका, संभावना सेठने केली विनंती; नक्की काय घडलं?

मी हिंदू आहे आणि राहणार! सना खानच्या 'बुरखा घाल' टिप्पणीवर संभावना सेठचं स्पष्टीकरण
बिग बॉसमध्ये सहभागी झालेली एकेकाळी अभिनेत्री असलेली सना खानने (Sana Khan) काही वर्षांपूर्वीच ग्लॅमरचं जग सोडलं. अनस सय्यदशी लग्न करुन ती संसारात रमली. तिने दोन मुलांना जन्मही दिला. सना खान नेहमी बुरखा घालून असते. नुकतीच तिने मैत्रीण आणि अभिनेत्री संभावना सेठची (Sambhavna Seth) भेट घेतली. दोघी एका पॉडकास्टसाठी जाणार होत्या. तेव्हा सना संभावनाला बुरखा घाल असं म्हणताना दिसते. या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर सना खानला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र आता अभिनेत्री संभावना सेठने व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.
अभिनेत्री संभावना सेठने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणाली, "आम्ही मैत्रिणी आहोत. मैत्रिणींमध्ये अशा गप्पा, मस्करी होतच असते. मीही तिला काय काय बोलत असते. ती मला बुरखा घाल म्हणाली हे अगदी मस्करीत होतं. कृपया सनाला ट्रोल करणं बंद करा. तिने आयुष्यात खूप काही बघितलं आहे. तिच्यासोबत असं करु नका. आम्ही रमजानच्या विषयावरील एका पॉडकास्टमध्ये जात होतो. म्हणून मी तयार होत असताना काहीतरी पारंपरिक कपडे घालावे असा माझा विचार होता. आम्ही एकमेकींना चिडवत होतो त्यातच तिने मला ओढणी घ्यायला सांगितलं. नंतर मस्करीत बुरखा घाल असं ती मला म्हणते. जर मला कोणी काही खरंच म्हणलं असतं तर मी त्याला सोडलं असतं का? हे सगळंच गंमतीत होतं. मित्र-मैत्रिणींमध्ये अशाच गप्पा होत असतात. समजून घ्या आणि तिला ट्रोल करणं बंद करा."
मी हिंदू आहे आणि हिंदूच राहणार
संभावना पुढे म्हणते, "मी हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आहे. तसंच ती मुस्लिम आहे आणि राहील. सगळ्यांची आपापली निवड आहे. कोणी कोणावर काहीही लादत नाहीए.