बिन कुछ कहे या मालिकेच्या सेटवर समीर अरोरा आणि अर्चना मित्तल घेतात शिकवण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2017 08:07 AM2017-03-31T08:07:31+5:302017-03-31T13:37:31+5:30
बिन कुछ कहे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेतील समीर अरोरा आणि शमता आंचन ...
ब न कुछ कहे ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेतील समीर अरोरा आणि शमता आंचन यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या मालिकेत आपल्याला जयपूरमधील कथा पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण मुंबईत न करता जयपूरमध्ये केले जात आहे. या मालिकेची संपूर्ण टीम गेल्या अनेक दिवसांपासून जयपूरमध्येच आहे. आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून चित्रीकरण करणे हे सगळ्यांसाठी आव्हानात्मक बनले आहे. या मालिकेत काम करणाऱ्या बालकलाकारांची तर परीक्षादेखील जवळ आली आहे. त्यामुळे अभ्यास कधी आणि कसा करायचा हा त्यांना प्रश्न पडला आहे. या मालिकेला एक वळण मिळणार असल्याने सगळ्याच कलाकारांची उपस्थिती गरजेची आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देणेही टीमला शक्य होत नाहीये. क्रिश चौहान हा तेरा वर्षांचा बालकलाकार या मालिकेत आर्यन कोहली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. चित्रीकरण मुंबईच्या बाहेर असल्याने अभ्यास आणि चित्रीकरण यात ताळमेळ घालणे त्याला अशक्य होत आहे. तो सध्या सातवीला असून काहीच दिवसांत त्याच्या परीक्षा आहेत. तो जयपूरला चित्रीकरणातून वेळ काढून अभ्यास करत असून यासाठी त्याला या मालिकेत कबीरची भूमिका साकारणारा समीर अरोरा मदत करत आहे. समीर आणि या मालिकेत मिसेस कोहलीची भूमिका साकारणाऱ्या अर्चना मित्तल हे दोघे मिळून त्याचा अभ्यास घेतात. दोघांनी क्रिशच्या अभ्यासाचे विषय वाटून घेतले असून त्याच्याकडून ते परीक्षेची तयारी करून घेत आहेत. याविषयी समीर सांगतो, "खरे तर मी दिवसभर चित्रीकरणानंतर संपूर्णपणे कंटाळलेलो असतो. पण तरीही चित्रीकरण संपल्यानंतर मी क्रिशसोबत अभ्यास करायला बसतो. तसेच चित्रीकरणादरम्यान मिळत असलेल्या वेळातदेखील आम्ही दोघे मेकअप रूममध्ये चित्रीकरण करतो. त्याचे आणि माझे आता एक वेगळेच नाते बनले आहे. आम्ही दोघे चित्रीकरणानंतरही जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवतो. मी जीमला, पोहायला अथवा टेबल टेनिस खेळायला गेलो तरी तिथे क्रिश माझ्यासोबत असतो. अर्चना मित्तल त्याला इंग्रजी शिकवतात तर मी त्याच्याकडून इतर विषयांची तयारी करून घेतो. अनेक वर्षांनंतर पुन्हा अभ्यास करणे मीदेखील एन्जॉय करत आहे."