"रात्री अडीच वाजता धावाधाव, डॉक्टर मिळेना अन्..." अभिनेत्रीने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:04 AM2023-07-24T09:04:43+5:302023-07-24T11:41:13+5:30

दुर्वा जेमतेम २ महिन्यांची होती तेव्हा तिचा हात डिसलोकेट झाला.

samidha guru marathi actress recalls she had experience of shree swami samarth | "रात्री अडीच वाजता धावाधाव, डॉक्टर मिळेना अन्..." अभिनेत्रीने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव

"रात्री अडीच वाजता धावाधाव, डॉक्टर मिळेना अन्..." अभिनेत्रीने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव

googlenewsNext

मराठी अभिनेत्री समिधा गुरु (Samidha Guru) आणि तिची लेक दुर्वा नेहमी सोशल मीडियावरील विनोदी रील्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. दुर्वा शाळेत असून ती खूपच टॅलेंटेड आहे. वेगवेगळ्या भाषेत बोलणं तिला खूप आवडतं. तसंच आईसोबत विनोदी व्हिडिओ बनवणंही तिला आवडतं. मायलेकी असेच काही व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर हिट असतात. तर दुर्वा अगदी काही महिन्यांची असताना समिधाला स्वामींचा अनुभव आला होता जो तिने एका मुलाखतीत सांगितला होता.

समिधा एका मुलाखतीत आठवण सांगताना म्हणाली, 'दुर्वा जेमतेम २ महिन्यांची होती तेव्हा तिचा हात डिसलोकेट झाला. हाताचं हाड सरकलंय हे जेव्हा आम्हाला कळलं आम्ही घाबरलो होतो. त्यावेळी रात्रीचे दोन अडीच वाजले होते. आम्ही डॉक्टरकडे गेलो पण एवढ्या रात्री एकही डॉक्टर भेटले नाहीत. डॉक्टरांनी हाताला वेळीच प्लास्टर लावलं तर बरं होईल असाच आम्ही विचार केला होता. पण डॉक्टरच नाहीत म्हणल्यावर आम्ही टेन्शनमध्ये आलो. शेवटी आम्ही घरी आलो आणि तिचा हात हातात स्वामींचं नामस्मरण करत बसलो. आता डॉक्टर नाहीत तर जे काही चमत्कार होईल ते स्वामीच करतील.'

समिधा पुढे म्हणाली, ' नामस्मरण करत करतच आम्हाला झोप लागली. सकाळी उठून बघतो तर दुर्ना अगदी छान हसत खेळत होती.  आम्ही आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहिलो. तरी म्हणलं एकदा डॉक्टरांना दाखवावं म्हणून तिला दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टर हात बघून म्हणाले हिला तर काहीच झालेलं नाही. हात अगदी सरळ आहे. प्लास्टरचीही गरज नाही. तेव्हा कळलं स्वामी होते आणि त्यांच्यामुळेच हे झालं.  तेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं आणि हात नॉर्मल आहे असं सांगितलं. आजही स्वामी आमच्या सोबत आहेत असा मला विश्वास वाटतो.'

समिधाने लेखक, दिग्दर्शक अभिजीत गुरुसह लग्न केले आहे. समिधा 'लवंगी मिरची' मालिकेत दिसली होती. तर सध्या ती 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेत दिसत आहे. त्यांना दुर्वा ही एकुलती एक मुलगी आहेय.

Web Title: samidha guru marathi actress recalls she had experience of shree swami samarth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.