'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, "आजकाल लेखन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 09:15 AM2023-09-14T09:15:49+5:302023-09-14T09:16:30+5:30

समीर चौघुले हे केवळ कलाकारच नाही तर लेखकही आहेत.

samir choughule maharashtrachi hasyajatra actor reveals he got threats after skit on lefty people | 'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, "आजकाल लेखन..."

'हास्यजत्रेतील एका स्कीटवरुन आले धमक्यांचे फोन' समीर चौघुले म्हणाले, "आजकाल लेखन..."

googlenewsNext

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून सर्वांना खळखळून हसवणारे सर्वच कलाकार आज लोकप्रिय स्टार झालेत. हास्यजत्रेतील एकेक स्क्रीप्ट तोडीस तोड असतं. वेगवेगळे विषय घेऊन प्रेक्षकांना हसवण्यचं काम हे कलाकार करत असतात. पण हसवणं हे काही फार सोपं नाही. त्यासाठी तशी स्क्रीप्ट लिहावी लागते. त्यामुळेच लेखकाचं काम खूप महत्वाचं आहे. नुकतंच कलाकार समीर चौघुलेंनी (Samir Choughule) लेखन ही सर्वात कठीण कला असल्याचं सांगितलं. ते असं का म्हणाले बघुया.

समीर चौघुले हे केवळ कलाकारच नाही तर लेखकही आहेत. अनेक स्किट्सचं लेखन त्यांनी केलेलं आहे. एखादी विनोदी स्क्रीप्ट लिहायची म्हणजे फार मोठी जबाबदारीच असते. कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. एका मुलाखतीत समीर चौघुले म्हणाले, "आजकाल लेखक म्हणून काम करताना अनेक बंधनं आली आहेत. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण अलीकडे लोकांच्या भावना या काचेपेक्षा नाजूक झाल्या आहेत. त्यामुळे आमची लेखकांची मिटींग जवळपास 10 तास वगैरे चालते. तसंच कोणत्या कलाकाराला कोणती भूमिका द्यायची याचा विचार करावा लागतो. हे माझं एकट्याचं काम नाही तर हे टीमवर्क आहे."

धमक्यांचेही फोन आलेत

ते पुढे म्हणाले, "एकदा एका स्कीटमध्ये मी लेफ्टी लोकांचं हस्ताक्षर फार काही खास नसतं असं लिहिलं होतं. हे स्कीट पाहिल्यानंतर लेफ्टी लोकांनी मला फोन करुन धमक्याच दिल्या. आमचं अक्षर चांगलं नाही का? असं कसं म्हणता? ते जाम भडकले. यावरुन कळलं की आपण विनोदासाठी गोष्टी दुर्लक्ष करुन चालणार नाहीत. सगळ्या गोष्टी संवेदनशील झाल्या आहेत. आजकाल मनमोकळेपणाने एखाद्या विषयावर बोलणंही कठीण आहे."

समीर चौघुले महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील एक सिनिअर कलाकार आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर वेगळीच जादू केली आहे. १५-२० वर्षांचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. ५ मिनिटांच्या स्किटमागे नक्की काय मेहनत असते हेच त्यांनी सांगितलं आहे.

Web Title: samir choughule maharashtrachi hasyajatra actor reveals he got threats after skit on lefty people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.