'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:21 AM2024-06-26T11:21:46+5:302024-06-26T11:22:14+5:30

आता अभिनेत्री समृद्धी केळकर हिने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

samruddhi kelkar dance on angaron sa song from pushpa 2 movie watch video | 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स

'अंगारो सा' गाण्यावर थिरकली समृद्धी केळकर, श्रीवल्लीपेक्षाही केला भन्नाट डान्स

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या दाक्षिणात्य सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच 'पुष्पा २'मधील 'अंगारों सा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गाणं प्रदर्शित होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 

बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच मराठी कलाकारांनीही 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता अभिनेत्री समृद्धी केळकर हिने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत समृद्धी तिच्या डान्स ग्रुपबरोबर  'अंगारो सा' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 'अंगारो सा' आणि 'एक लाजरान साजरा मुखडा' या गाण्यांच्या फ्युजनवर समृ्द्धीने डान्स केला आहे. तिच्या डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. समृद्धीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

समृद्धी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी टेलिव्हिजनवरचा लाडका चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. सध्या ती मी होणार सुपरस्टार या शोचं सूत्रसंचालन करत आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच समृद्धी उत्तम डान्सरही आहे. 
 

Web Title: samruddhi kelkar dance on angaron sa song from pushpa 2 movie watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.