'संध्या बींदणी'ने मुलाचा पहिला वाढदिवस केला साजरा,पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:15 AM2018-05-22T10:15:08+5:302018-05-22T15:45:08+5:30
'दीया और बाती हम' मालिकेत संध्या बिंदणी बनत घराघरात पोहचलेली दीपिका सिंहने मुलगा आता एक वर्षाचा झाला आहे. दिपिकाने ...
' ;दीया और बाती हम' मालिकेत संध्या बिंदणी बनत घराघरात पोहचलेली दीपिका सिंहने मुलगा आता एक वर्षाचा झाला आहे. दिपिकाने मुलाचा सोहम असे नाव ठेवले आहे.आता सोहमचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.दीपिकाने आपल्या फ्रेंड्सला पती रोहित राज गोयलसोबत मुलाच्या वाढदिवसाची पार्टी दिली.दीपिकाने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.शेअर केलेल्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
दीपिकाने 2 मे, 2014 ला डायरेक्टर रोहित राज गोयलसोबत लग्न केले होते.पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला होता. दीपिका ही अभिनेत्री आहे तर रोहित राज हा दिग्दर्शक आहे. 'दिया और बाती हम' शोमधूनच दीपिकाने अभिनयाला सुरुवात केली होती.आणि याच मालिकेचा रोहित दिग्दर्शकही होता.एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.पुढे या दोघांनी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली.दोघेही 'नच बलिए-6' पर्वातही झळकले होते.
बाळाच्या जन्मानंतर बाळाची नीट काळजी घेता यावी म्हणून ती काही महिने तरी मालिकेचे शूटिंगमधू ब्रेक घेतला आहे.दीपिकाने सोहम ठेवले असून सोहम रोहित गोयल या नावाने तो ओळखला जाणार असे दिपिकाने सोशल मीडियावर चाहत्यांना सांगितले होते.'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच 'दिया और बाती हम' या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली.राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं.त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली.गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 'दिया और बाती' या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता.
cnxoldfiles/a>यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे.दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत असल्यातरी आता तिला मालिकांमध्ये रस नाही तर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची इच्छा आहे.