संध्या बिंदणी पडली सेटवर दिग्दर्शकाच्या प्रेमात अन् सहकलाकाराला लगावली कानशिलात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 03:25 PM2023-07-26T15:25:16+5:302023-07-26T15:25:56+5:30

Deepika Singh : 'दिया और बाती हम' या टीव्ही मालिकेतून दीपिका सिंगने छोट्या पडद्याच्या दुनियेत पाऊल ठेवले.

Sandhya Bindani fell in love with the director on the set and fell in love with her co-star | संध्या बिंदणी पडली सेटवर दिग्दर्शकाच्या प्रेमात अन् सहकलाकाराला लगावली कानशिलात

संध्या बिंदणी पडली सेटवर दिग्दर्शकाच्या प्रेमात अन् सहकलाकाराला लगावली कानशिलात

googlenewsNext

२०११ साली दिया और बाती हम मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले होते. या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंग(Deepika Singh)ने संध्या आणि अभिनेता अनस रशीदने सूरज ही भूमिका साकारली होती. दीपिका आणि अनसची ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणाऱ्या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवले होते. त्यामुळे छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली होती. लग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते.

२६ जुलै १९८९ रोजी दिल्लीत जन्मलेली दीपिका सिंगला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिने सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतच केले. त्यानंतर मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी ती पंजाब टेक्निकल युनिव्हर्सिटीकडे वळली होती. दीपिकाने मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असले, तरी तिचे मन अभिनयाच्या दुनियेत रमले आणि तिने 'दिया और बाती हम' या टीव्ही मालिकेतून छोट्या पडद्याच्या दुनियेत पाऊल ठेवले. या मालिकेत संध्या कोठारीची भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात प्रसिद्ध झाली. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्येही दिसली आहे.


मालिकेच्या शूटिंगदरम्यान दीपिका दीया और बाती हमचा दिग्दर्शक रोहित राज गोयलच्या प्रेमात पडली होती. त्याचवेळी रोहितलाही दीपिका मनापासून आवडू लागली होती, पण कोणीही त्यांच्या मनातील बोलायला तयार नव्हते. मात्र, दोघेही रोज सुमारे १२ ते १८ तास एकत्र घालवायचे. त्याचबरोबर दर मंगळवारी ते दोघे एकत्र सिद्धिविनायकाच्या मंदिरात जात असत. दीपिकाच्या अफेअरची अफवा पसरल्यावर रोहित नाराज झाला. त्याने दीपिकाला याबाबत विचारले असता तिने ही अफवा असल्याची माहिती दिली. अशा परिस्थितीत दोघेही जवळ येत राहिले आणि २०१४ मध्ये त्यांनी लग्न केले.

दीपिका सिंग अडकली होती वादाच्या भोवऱ्यात
दिया और बाती हम या मालिकेच्या शूटिंगदरम्यान दीपिका सिंगही वादात सापडली होती. खरेतर, एका इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान तिने सूरजची भूमिका साकारणाऱ्या अनस रशीदला थापड मारली होती. या घटनेनंतर दीपिकाने शो सोडण्याची धमकीही दिली होती. त्याचवेळी दीपिका आणि अनस रशीद यांच्यातील संभाषणही अनेक महिन्यांपासून बंद होते.

Web Title: Sandhya Bindani fell in love with the director on the set and fell in love with her co-star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.