आज ठरणार संगीत सम्राट पर्व २चा विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 12:18 PM2018-10-13T12:18:29+5:302018-10-14T07:15:00+5:30
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे अशा अनेक कलावंतानी संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर केली. महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी सूर, ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे स्पर्धकांचे परीक्षण केले.
झी युवावरील संगीत सम्राट पर्व २ या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता येणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रिय झाला आहे आणि त्यामुळे घराघरामध्ये हा कार्यक्रम पाहिला जाऊ लागला. सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राला पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेचा मोठा वारसा झी युवा या वाहिनीने संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे पुढे नेला.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे अशा अनेक कलावंतानी संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर केली. महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी सूर, ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे स्पर्धकांचे परीक्षण केले तर आपल्या चार कॅप्टन्सच्या चार टीम्स म्हणजेच सावनी रवींद्रची नादमधुर सह्याद्री, जुईली जोगळेकरची स्वरमयी कोकण, राहुल सक्सेनाची सुरसाज विदर्भ आणि अभिजीत कोसंबीची लयदार मराठवाडा यांच्यात ही चुरस रंगली. परीक्षकांनी सुद्धा संगीत सम्राटची उत्कंठा वाढवण्यासाठी नियमात फेरबदल करून चार ऐवजी सहा फायनलिस्ट ठेवले आहेत. त्याचबरोबर आनंद शिंदे आणि वैशाली सामंत हे दोन महाराष्ट्राचे आवडते गायक यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे परीक्षण केले. संगीत सम्राट २ साठी कोकण कन्या, हरगुण कौर, जिज्ञेश वझे, फोक रिवाईवल, कैवल्य केसकर आणि संकेत बार्डिया या सहा स्पर्धकांमध्ये ही चुरस होणार आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.
संगीत सम्राट पर्व २ च्या महाअंतिम सोहळ्यासाठी खास करून वीर हास्य सम्राट विनोदवीर भाऊ कदम यांनी मंचावर शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सोबत एक सुंदर गाणं सादर केलं आहे. त्यामुळे ही प्रेक्षकांसाठी संगीताची मेजवानीच असणार आहे. आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या गाण्यांची तुफान मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे .